Constitution Day of India 2019: भारतीय संविधान दिवस साजरा करण्याचं नेमकं कारण काय?
आजचा दिवस 'संविधान दिन' सोबतच राष्ट्रीय विधी दिन म्हणून देखील साजरा केला जातो.
भारतामध्ये यंदा 26 नोव्हेंबर दिवशी भारतीय संविधानाचे 69 वे वर्ष साजरे केले जात आहे. आजचा दिवस 'संविधान दिन' सोबतच राष्ट्रीय विधी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकरा यांच्या योगदानातून देशाला भारतीय संविधान मिळाले. जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून त्याची ओळख आहे. ब्रिटीश राजवटीची गुलामगिरी झुगारत भारताला 15 ऑगस्ट 1947 दिवशी स्वातंत्र्य मिळाले. पुढे देशाचा कार्यभार विशिष्ट कायदेशीर चौकटीमध्ये राखून करण्यासाठी भारताचे संविधान बनवण्यात आले. भारताने 26 जानेवारी 1950 दिवशी हे संविधान सीकारले. मग भारतीय संविधान दिन साजरा करण्याची प्रथा कधी, कशी सुरू झाली हे जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल नक्की वाचा.
2015 साली बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती होती, त्या निमित्ताने भारतामध्ये 'संविधान दिन' साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. संविधान दिनाचं औचित्य साधत राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये, 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येते. 26 जानेवारी 1950 ला भारतात लागू झाले संविधान; संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी.
भारतीय संविधानाबद्दल काही खास गोष्टी
29 ऑगस्ट, 1947 पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा सात दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.
संविधान बनवण्याच्या कामासाठी 165 दिवस सारे काम करत होते. त्यावर विचारविनिमय झाला. 13 फेब्रुवारी, 1948 रोजी घटना समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. त्यावेळी 7635 दुरूस्त्या करण्यास सांगितल्या. त्यापैकी 2973 दुरूस्त्या मान्य करण्यात आल्या.
घटनानिर्मितीसाठी 63 लाख 729 रू. इतका खर्च करण्यात आला होता.
भारताचे संविधान हस्तलिखित आहे, याची 1 हिंदी आणि 1 इंग्रजी आवृत्ती आहे, ज्यात 48 आर्टिकल्स आहेत. 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती.
भारतीय संविधानाला अंतिम देण्यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले.
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा दिवस होता 'भारतीय संविधान दिन'. मात्र तेव्हापासून शासन दरबारी हा दिवसाची 'काळा दिन' म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस 'काळा दिवस' म्हणून भारतीय जनतेमध्ये कायमचाच रूजला.
भारतीयांचे हक्क आणि अधिकार जपण्यासाठी भारतीय संविधान एक महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून तुम्हांला आज संविधान दिनाचं औचित्य साधत सेलिब्रेट करा.