Christmas Party Dress Ideas For Kids: ख्रिसमस पार्टी साठी 'Red and White' ड्रेसमध्ये लहान मुलांना कसे तयार कराल? पाहा काही Tricky Ideas
मुलांना नवीन कपडे घेणे शक्य नसल्यास काही ट्रिक्स वापरुन तुम्ही आहे त्या कपड्यांमध्ये त्यांना Red and White ड्रेसकोडमध्ये नटवू शकता.
Christmas 2019: ख्रिसमस म्हणजे लहानग्यांचा आवडता सण. कारण काहीही न सांगता, न मागता नाताळ बाबा त्यांच्यासाठी गिफ्ट्स घेऊन येतो अशी या चिमुरड्यांची भाबडी कल्पना असते. त्यांची ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्या आई-बाबांपासून त्याची घरातील आणि शाळेतील मंडळी प्रयत्नात असतात. यासाठी शाळांमध्ये ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते. ख्रिसमस मधील नाताळ बाबाचा ड्रेस हा लाल आणि पांढ-या रंगाचा असल्यामुळे तिच ड्रेसकोडची थीम शाळांमध्येही असते. त्यामुळे शाळेत ख्रिसमस निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमध्येही हीच थीम दिसते. त्यामुळे मुलांना काय नवीन ड्रेस घ्यायचे असा प्रश्न मुलांच्या पालकांना पडलेला असतो.
मुलांना नवीन कपडे घेणे शक्य नसल्यास काही ट्रिक्स वापरुन तुम्ही आहे त्या कपड्यांमध्ये त्यांना Red and White ड्रेसकोडमध्ये नटवू शकता.
1) लहान मुलींसाठी जर तुमच्या कडे लाल रंगाचा स्कर्ट असेल तर त्यावर एखादा पांढ-या रंगाचा टॉप लावून त्यांना लाल आणि पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये तयार करु शकता किंवा पुर्ण पांढ-या रंगाचा किंवा लाल रंगाचा ड्रेस घालून त्यावर विरुद्ध रंगाचे हेअर बँड, दुपट्टा घालू शकता.
2) मुलींकडे ज्वेलरी मध्ये भरपूर पर्याय असल्यामुळे हेअर बँड, क्लिप, सँडल, ब्रेसलेट, कानातले यांसारख्या पर्यायांचा वापर करुन त्यांना Red and White थीममध्ये तयार करु शकता.
3) मुलांकडे ज्वेलरीचे पर्याय नसले तरीही ड्रेसचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यात
Red and White वेस्ट कोट, OppoSuit OppoSuits Christmas Suits मध्ये तयार करु शकता.
4) जर तुमच्या कडे पांढ-या रंगाचे टी-शर्ट असेल तर त्यावर लाल रंगाची हुडी किंवा लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये पांढ-या रंगाची हुडी मुलांना घालू शकता. थंडी आणि ख्रिसमस या दोन्ही थीम यामध्ये येऊन जातील.
5) तसेच जर तुमच्याकडे लाल आणि पांढ-या रंगांमधील एकाच रंगाचा ड्रेसअसेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या गळ्यात स्टायलिश स्कार्फ घालू शकता. यातही त्यांना कूल लुक येईल.
Christmas Party Dress Ideas For Kids: ख्रिसमस पार्टीसाठी लहान मुलांना कसे तयार कराल?Watch Video
अशा काही अंतरंगी ट्रिक्स वापरल्या तर तुमच्या मुलांचा मूडही खराब होणार नाही आणि त्यांच्या मनासारखे ड्रेस मिळाले म्हणून त्यांची ख्रिसमस पार्टी ही धमाकेदार होईल.