Christmas 2022 Celebration In Mumbai: यंदा मुंबईतील ख्रिसमस सेलिब्रेशन स्पेशल करा या 3 प्राचीन चर्च ना भेट देऊन!
यंदा नाताळ विकेंडला असल्याने या सुट्टीच्या निमित्ताने मुंबई (Mumbai) मध्येच नाईटलाईफ सोबत या नववर्षाच्या स्वागताचा काळ थोडा खास अंदाजात सेलिब्रेट करण्यासाठी नाताळ निमित्त तुम्ही कुठे भेट देऊ शकता याची देखील थोडी माहिती घ्या.
मुंबई (Mumbai) हे एक असं शहर आहे जे कधीच झोपत नाही अशी त्याची ओळख आहे. एरवी सतत गजबजणारं हे शहर आता डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये अधिकच व्हायब्रंट अंदाजामध्ये दिसतं. देशा-परदेशातील पर्यटकांना मुंबई भुरळ घालत असते. प्रामुख्याने दक्षिण मुंबईचा भाग आणि उपनगरातही काही जुन्या इमारती, रस्ते, गल्ली-बोळ्यांमधून फिरण्याची मज्जा काही और असते. आता ख्रिसमस (Christmas) अर्थात नातळचा (Natal) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा नाताळ विकेंडला असल्याने या सुट्टीच्या निमित्ताने मुंबई (Mumbai) मध्येच नाईटलाईफ सोबत या नववर्षाच्या स्वागताचा काळ थोडा खास अंदाजात सेलिब्रेट करण्यासाठी नाताळ निमित्त तुम्ही कुठे भेट देऊ शकता याची देखील थोडी माहिती घ्या.
नाताळचा सण म्हणजे खरी मज्जा असते ती चर्च मध्ये. मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी असल्याने या शहरात ख्रिस्मस देखील सामान्य मुंबईकर ख्रिस्ती बांधवांसोबत आनंदाने साजरा करतो. मग मुंबईतील अशीच काही प्राचीन आणि कदाचित वर्षानुवर्ष मुंबईत राहूनही अनेकांना ठाऊक नसतील अशा ठिकाणी भेट देऊन साजरा करू शकता. नक्की वाचा: Diet tips for Diabetics: मधुमेहींनो! Christmas, New Year Celebrations च्या धामधूमीत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' डाएट टीप्स!
ख्रिस्मस 2022 निमित्त कुठे द्याल भेट?
Saint Peter’s Church of Bandra
वांद्रे स्थित सेंट पीटर्स चर्च मध्ये ख्रिस्मसचा खास उत्साह असतो. हे कॅथलिक चर्च त्याच्या ऐतिहासिक Romanesque vibe सह ख्रिसमसच्या सणाची खरी रंगत तुम्हांला यंदा आठवणींच्या स्वरूपात देऊ शकेल. नक्की वाचा: Best Christmas Places In Maharashtra: ख्रिसमसच्या सुट्या घालवण्यासाठी महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांची यादी, पाहा .
Woodhouse Church,Colaba
दक्षिण मुंबईला रात्रीच्या वेळी न्याहाळण्याची मज्जाच काही और आहे. ब्रिटीश कालीन संस्कृतीचे भास या भागात अनेकदा जाणवतात. कुलाबा येथील वूडहाऊस चर्च हे मुंबईमधील 100 वर्षांहून जुन्या काही चर्चपैकी एक आहे. येथील आर्टवर्क, स्थापत्यशास्त्र आणि कलाकुसर भारावून टाकणारी आहे. ही इमारत 1998 साली heritage building म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
St. Thomas Cathedral Church, Fort
दक्षिण मुंबईकरांच्या पसंतीच्या चर्च पैकी एक हे सेंट थॉमस कथॅएड्रल चर्च आहे. हे मुंबई मधील पहिलं वहिलं Anglican church आहे. मुंबईतील या जुन्या ब्रिटीश चर्च मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने मास पार पाडला जातो. कॅरल गायली जातात.
यासोबतच मुंबई मध्ये भायखळ्याचं Gloria Church देखील प्रसिद्ध आहे. माहिमच्या व्हिक्टोरिया चर्च मध्येही नाताळ निमित्त प्रादेशिक भाषेतही कॅरल गाण्याची आणि ऐकण्याची तुम्ही मज्जा लुटू शकता. यासोबतच नाताळ निमित्त आता अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई केली जाते. अनेक महत्त्वाची ठिकाणी विद्युत रोषणाईमध्ये झगमगत असतात.