Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त शिवबांना अभिवादन करणारे मराठी Messages, Images!
एक कुशल प्रशासक म्हणून आजही त्यांचा आदर्श घेतला जातो.
Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: 3 एप्रिल हा शिवभक्तांसाठी खास दिवसांपैकी एक आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी 3 एप्रिल 1680 दिवशी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शिवरायांप्रति आदरांजली अर्पण करण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले फोटोज तुम्ही डाऊनलोड करून शेअर करू शकता. शहाजी राजे आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला होता. महाराजांनी आपल्या पराक्रमांनी, शौर्याने, धाडसाने आणि रयतेप्रती असलेल्या प्रेमाने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांनी निर्माण केलेले स्थान इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. नक्की वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 Quotes: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करा त्यांचे 'हे' अनमोल विचार!
छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन 2024
शिवरायांच्या संघर्षमय आयुष्यात ते अगदी जिद्दीने लढले. एक कुशल प्रशासक म्हणून आजही त्यांचा आदर्श घेतला जातो. अनेक लढाया, मोहिमा शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने जिंकल्या. तेजस्वी, प्रेरणादायी, आदर्श अशा राजाला पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांमधील एकतरी गुण अंगिकारुया आणि पुढील पिढीपर्यंत पोहचवूया.