Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Sohala 2022 HD Images: शंभूराजेंच्या राज्याभिषेक दिनानिमित्त Message, Whatsapp Status, Facebook Post शेअर करुन छत्रपतींच्या शौर्याला करा सलाम!
छत्रपती संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 मध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शंभूराजांचा आज राज्याभिषेक साजरा होत आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची सर्व जबाबदारी त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आली.
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Sohala 2022 HD Images: छत्रपती संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 मध्ये राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. शंभूराजांचा आज राज्याभिषेक साजरा होत आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची सर्व जबाबदारी त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आली. त्यामुळे शंभूराजांनी खचलेल्या रयतेला आधार देत आपला राज्याभिषेक करून घेतला. यावेळी त्यांनी जनतेला शिवरायांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील, याची ग्वाही दिली.
शंभुराजे लहानपणापासुनचं जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते. शिवरायांच्या सुचनेनुसार शंभुराजेंनी पन्हाळ्यावरुन राज्यकारभार सुरु केला. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इ.स. 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनचं मिळाले होते. तर यंदाच्या शंभूराजेंच्या राज्याभिषेक दिनानिमित्त Message, Whatsapp Status, Facebook Post शेअर करुन त्यांच्या शौर्याला करा सलाम!

समोर मृत्यू दिसत असतानाही शत्रूपुढे शरण न जाण्याची शिवरायांची शिकवण पाळत त्यांनी बलिदानाचा इतिहास रचला. अशा थोर राजाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2022 07:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

