Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas 2024: कधी आहे बलिदान दिन? घ्या जाणून
मराठी साम्राज्यातील एक अढळ तारा निखळला गेला. तेव्हापासून 11 मार्च हा बलिदान दिन (Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas 2024) म्हणून साजरा केला जाऊ लागला. जाणून घ्या बलिदान दिन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी.
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे नाव जरी उच्चारले तरी अनेकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो जाज्वल्य बलिदानाचा (Balidan) इतिहास. छत्रपती संभाजी राजे यांनी आपल्या एकूण आयुष्या प्रचंड पराक्रम केला. खरे तर मराठी मुलखातील फंदफितूरीने त्यांचा घात केला. अन्यथा.. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा झेंडा आणि पराक्रम आणखी दिमाखाने वाढत राहिला असता. पण, कदाचित नियतीच्या मनात तसे होणे नव्हते. इतिहासात नोंद तारखेनुसार 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजे यांचे औरंगजेबाने बलीदान घेतले. मराठी साम्राज्यातील एक अढळ तारा निखळला गेला. तेव्हापासून 11 मार्च हा बलिदान दिन (Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas 2024) म्हणून साजरा केला जाऊ लागला. जाणून घ्या बलिदान दिन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी.
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होय. त्यांचा जन्म 14 मे 1656 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांना पहिली पत्नी सईबाई यांच्यापासून पूत्ररत्न प्राप्त झाले. प्रेमाने त्यांचे नाव संभाजी ठेवण्यात आले. पण, दुर्दैव असे की, संभाजी राजे अवघे दोन वर्षांचे असतानाच सईबाई यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले. (हेही वाचा, संभाजी महाराजांबद्दल 10 प्रमुख तथ्ये, जाणून घ्या)
संभाजी राजे तरुण झाले. त्यांनी आपले पराक्रम दाखविण्यास सुरुवात केली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजीराजे यांच्याकडे आली. स्वराज्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळत असतानाच एके दिवशी घात झाला. फंदफितूरीमुळे संभाजी महाराज औरंजेब बादशाहाच्या हाती लागले. त्यांना कैदेत ठेवण्यात आले. प्रदीर्घ काळ कैदेत ठेवल्यानंतर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत वेदनादायी पद्धतीने हत्या करण्यात आली. तो दिवस होता 11 मार्च 1689. तेव्हापासून बलिदान दिन साजरा करण्यात येऊ लागला.
अनेक इतिहासकारांनी केलेल्या नोंदीनुसार, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या अल्पायुष्यामध्ये 150 हून अधिक लढाया लढल्या. त्यातील बहुतांश लढाया त्यांनी जिंकल्या. त्यांना स्कृत आणि प्रादेशिक भाषा तसेच पोर्तुगीजसह 13 हून अधिक भाषा अवगत होत्या. कवी कलश हे त्यांचे मुख्य सल्लागार होते. शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सोयराबाईआणि या संभाजी महाराज यांच्या सावत्र आई होत्या. त्यांनी आपला 10 वर्षांचा मुलगा राजाराम याला मराठा राज्याचा वारस म्हणून राज्याभिषेक केला होता. ही बातमी संभाजी महाराजांना कळताच त्यांनी 20,000 सैन्यासह रायगड किल्ल्यावर कूच केली आणि औपचारिकपणे सिंहासनावर ग्रहण केले.