Chandra Grahan 2020: उद्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; गर्भवती महिलांनी घ्यावी 'ही' खास काळजी

उद्या म्हणजेच शुक्रवार 10 जानेवारी रोजी वर्षातील पहिले चंद्र ग्रहण लागणार आहे.या लहरींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, गर्भवती महिलंनी तर आवर्जून या गोष्टी पाळाव्यात असे सांगितले जाते.

Pregnancy and Lunar Eclipse (Photo Credits: File Photo)

Chandra Grahan 2020: उद्या म्हणजेच शुक्रवार 10 जानेवारी रोजी वर्षातील पहिले चंद्र ग्रहण लागणार आहे. ग्रहणाचा अवधी 4  तास 5  मिनिटे इतका असून रात्री 10 वाजून 37 मिनिटांपासून ते पहाटे 2  वाजून 42 मिनिटांपार्यंत याचा प्रभाव कायम राहील. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, चंद्र ग्रहणात काही राशींवर मोठा प्रभाव पडतो, काहींना नकारत्मक तर काहींना सकारात्मक पद्धतीने हा प्रभाव जाणवतो, या लहरींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, गर्भवती महिलंनी (Pregnant Women) तर आवर्जून या गोष्टी पाळाव्यात असे सांगितले जाते .Chandra Grahan 2020: जानेवारी महिन्यात या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; तारीख, वेळ, कालावधी घ्या जाणून

मुळात उद्याचे हे चंद्रग्रहण फारसे थेट नसून हे केवळ छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा सुतक अवधी नसेल परिणामी पूजा पाठ टाळण्याची काहीही आवश्यकता नाही मात्र नियमित करायच्या कामांमध्ये थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. काय आहेत हे नियम जाणून घ्या..

1- टोकदार वस्तूंचा वापर करणे टाळा

ग्रहणाच्या दरम्यान टोकदार वस्तू जसे की सूरी, कात्री, चाकू, सुई इत्यादींचा वापर करणे टाळा. असं म्हणतात, के या काळात गर्भवती महिलांनी टोकदार वस्तूचा वापर केल्यास बाळाच्या नाक, कान, ओठांना नुकसान होते.

2-बाहेर जाणे टाळा

ग्रहण पाहिल्यास त्याचा परिणाम बाळाच्या शहरीरीक व मानसिक स्वास्थ्यावर होती असे मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास बाहेर जाणे टाळावे, अगदी आवश्यक व न टाळता येण्यासारखे काम असल्यास ग्रहणाच्या छायेपासून स्वतःचे रक्षण होतेय याची खबरदारी घ्यावी.  पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारीला; जाणून घ्या कोणत्या राशीवर कसा पडणार प्रभाव

3- ग्रहण काळात खाऊ नये

ग्रहण काळात बनवलेल्या जेवणावर किरणांचा प्रभाव पडतो त्यामुळे होणारे नुकसान वाचवण्यासाठी ग्रहणाची वेळ आणि अवधी बघून त्याआधी जेवून घेणे फायद्याचे ठरेल, अगदी शक्य नसल्यास या काळात बनवण्यात येणाऱ्या जेवणात तुळशीचे पान टाकून ठेवावे ज्यामुळे किरणांचा प्रभाव कमी अपायकारक होतो.

4-ग्रहण संपताच आंघोळ करा

ग्रहण संपताच गर्भवती महिलेने आंघोळ करणे आवश्यक आहे यामुळे, शरीरावर थोडाफार जरी परिणाम झाला असेल तर तो निघून जातो आणि बाळाला शारीरिक व त्वचेसंबंधी अपाय होत नाहीत. या आंघोळीच्या पाण्यात तुळशीचे पण टाकून मग अंगावर पाणी घ्यावे.

5-शारीरिक संबंध ठेवू नका

ग्रहण काळात आपल्या पार्टनर सोबत शारीरिक संबंध ठेवू नका. तसेच औषधे घेणे, देवाच्या मूर्त्यांना स्पर्श करणे देखील शक्य तितके टाळा.

Chandra Grahan 2020: उद्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण; गर्भवती महिलांनी घ्यावी 'ही' खास काळजी Watch Video

भारतीय संस्कृतीत ग्रहणासंबंधित विविध समज प्रचलित असले तरी ग्रहणाचे नकारात्मक परिणामांमागे कोणतेही शास्त्रिय कारणं अद्याप समोर आलेले नाही. परंतु, गर्भाच्या काळजीपोटी हे नियम पाळणे अयोग्य ठरणार नाही.

(टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)