Chaitra Navratri 2020 Wishes: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून आनंदाने साजरा करा वासंती नवरात्र सोहळा!
चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images तुमच्या आप्तलगांसोबत शेअर करा.
Chaitra Navratri 2020 Marathi Wishes: चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ते चैत्र शुद्ध नवमी (रामनवमी) पर्यंत चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) साजरी केली जाते. याच सणाने वसंत ऋतूची सुरुवात होते म्हणून या सोहळ्याला वासंती नवरात्र म्हणून देखील ओळखले जाते. यंदा 25 मार्च ते 2 एप्रिल या काळात चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. कोणत्याही सणाची खरी मजा ही आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी तसेच प्रियजनांच्या सोबत साजरी करण्यात येते. पण कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक संकटामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे आपल्या यंदा जवळच्या व्यक्तींना सुद्धा भेटता येणे शक्य होणार नाही, अशावेळी डिजिटल माध्यमातून तुम्ही तुमच्या शुभेच्छा जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहचवू शकता. यासाठी हे चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देणारे हे मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images तुमच्या आप्तलगांसोबत शेअर करा.
चैत्र नवरात्रीमध्ये मां शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्रि देवीच्या रूपाची आराधना केली जाते. या पूजनाने निर्माण होणाऱ्या मंगलमयी वातावरणात तुम्ही शुभेच्छांच्या माध्यमातून आणखीन पावित्र्य आणू शकाल. Chaitra Navratri 2020 Messages: चैत्र नवरात्री च्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status, Images च्या माध्यमातून देऊन भक्तिमय वातावरणात साजरा करा हा नऊ दिवसांचा उत्सव
चैत्र नवरात्री 2020 मराठी शुभेच्छा
हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. चैत्र महिन्यात पहिली चैत्र नवरात्र साजरे केले जाते. दुसरी नवरात्र जून-जुलै महिन्यात, तिसरे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथी नवरात्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते. यापैकी पहिली नवरात्र उद्यापासून सुरु होत आहे यानिमित्ताने आपणा सर्वांस लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा!