Bhaubeej 2023 HD Images: भाऊबीज निमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे साजरा करा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण
तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Bhaubeej 2023 HD Images: दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज (Bhaubeej 2023) साजरी केली जाते. या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळक लावते आणि त्याच्या यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. या सणाबाबत अशी मान्यता आहे की मृत्यूचे देवता यमराज एकदा त्यांची बहीण यमुनाजीच्या घरी गेले होते आणि यमुनाजींनी त्यांचे स्वागत केले. त्यांना तिलक लावला. त्या दिवसापासून हा उत्सव भाईबीज या नावाने प्रसिद्ध झाला.
यमराज देवांनी आपल्या बहिणीला प्रेमाने सांगितले की, यापुढे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या ज्या बहिणी आपल्या भावांना टिळक लावून भाऊबीजचा सण साजरा करतील, त्यांच्या भावांना दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांना सदैव आनंद मिळेल. तुम्ही खालील Images, Wishes, Greetings द्वारे आपल्या लाडक्या भावाला खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Bhau beej 2023 Special Rangoli Designs: भाऊबीज निमित्त घरासमोर काढा ही सोपी आणि झटपट रांगोळी, पाहा व्हिडिओ)
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या लाडक्या भावाला
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
मान्यतेनुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. यावेळी, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 म्हणजेच उद्या, 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:36 ते 1:47 पर्यंत असेल. बुधवारी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी हा सण साजरा करणे अधिक शुभ मानले जाईल.