Happy Bhaubeej 2024 Greetings In Marathi: भाऊबीजेनिमित्त Images, Wishes, Messages, Quotes द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा देत साजरा करा मंगलमय दिवस!

हा दिवस आणखी खास करण्यासाठी तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील भाऊबीज ग्रेंटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

Bhaubeej 2024 Greetings 6 (Photo Credit - File Image)

Happy Bhaubeej 2024 Greetings In Marathi: दिवाळीनंतर तीन दिवसांनी भाऊबीजेचा (Bhaubeej 2024) सण साजरा केला जातो. यावर्षी भाईबीज 3 नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीज हा देखील भाऊ-बहिणीचा सण आहे. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात आणि रक्षाबंधनाला ज्याप्रमाणे बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर धागा बांधतात, त्याचप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी बहिण आपल्या भावाला एक पवित्र धागा देत. महाराष्ट्रात हा धागा कंबरेला बांधण्याची प्रथा आहे.

दिवाळी सोबतच भाऊबीजेचा सण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी तो साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि भावाला जेवण दिल्यावरच उपवास सोडतात. हा दिवस आणखी खास करण्यासाठी तुम्ही आपल्या भावाला किंवा बहिणीला भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील भाऊबीज ग्रेंटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,

भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

Bhaubeej 2024 Greetings 1 (Photo Credit - File Image)

तांदूळाचा सुवास आणि केशराचा रंग,

कपाळावर लागला टिळा आणि आली आनंदाची लाट, बहिणीची साथ आणि भरपूर प्रेम,

तुम्हा सगळ्यांना भाऊबीज शुभेच्छा!

Bhaubeej 2024 Greetings 2 (Photo Credit - File Image)

आमचं भाऊ-बहिणीचं नातं

कायम राहू दे खास,

भाऊबीज आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Bhaubeej 2024 Greetings 3 (Photo Credit - File Image)

रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास,

भाऊबहीणीसाठी आजचा दिवस आहे खास

भाऊबीजेच्या लाख लाख शुभेच्छा!

Bhaubeej 2024 Greetings 4 (Photo Credit - File Image)

भाऊबीजेचा सण आहे,

भावाला औक्षण करायला बहीण तयार आहे,

लवकर घे ओवाळून दादा,

गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhaubeej 2024 Greetings 5 (Photo Credit - File Image)

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी संज्ञा यांना मुलगा यमराज आणि मुलगी यमुना ही दोन मुले होती. यम पापींना शिक्षा देत असे. यमुना मनाने शुद्ध होती आणि लोकांचे हाल पाहून तिला वाईट वाटले, म्हणून ती गोलोकात राहिली. एके दिवशी बहीण यमुनेने भाऊ यमराजाला गोलोकात भोजनासाठी बोलावले तेव्हा यमाने आपल्या बहिणीच्या घरी जाण्यापूर्वी नरकवासीयांना मुक्त केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif