Shiv Jayanti 2022 Images: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून साजरा करा शिवजन्मोत्सव!
खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शिवजन्मोत्सवाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
Shiv Jayanti 2022 Images: छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. ज्यांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी त्यांनी मुघल साम्राज्याचा शासक औरंगजेबाशी युद्ध केले. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते "छत्रपती" झाले. शिवरायांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले. त्यांनी गनिमी युद्धाची नवीन शैली विकसित केली. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि दरबारी शिष्टाचाराचे पुनरुज्जीवन केले आणि मराठी आणि संस्कृत यांना अधिकृत भाषा बनवले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नायक म्हणून ते कायम सर्वांच्या स्मरणात आहेत. बाळ गंगाधर टिळकांनी राष्ट्रवादाच्या भावनेच्या विकासासाठी शिवाजी जन्मोत्सव सुरू केला. यंदा 21 मार्च रोजी शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून तुम्ही शिवजयंती साजरी करू शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शिवजन्मोत्सवाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले हे शक्तिशाली सरंजामदार होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. शिवाजीच्या थोरल्या भावाचे नाव संभाजी होते. जे बहुतांश काळ वडील शहाजी भोसले यांच्यासोबत राहत असतं.