Gandhi Jayanti 2024 Messages In Marathi: गांधी जयंतीनिमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status शेअर करत साजरा करा महात्मा गांधीजींचा जन्मदिन

गांधी जयंतीनिमित्त तुम्ही देखील Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास गांधी जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Gandhi Jayanti 2024 Messages 6 (Photo Credit - File Image)

Gandhi Jayanti 2024 Messages In Marathi: दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती (Mahatma Gandhi Jayanti 2024) साजरी केली जाते. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी आहे. हा दिवस महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि विचारांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही महात्मा गांधींच्या योगदानाला मान्यता दिली आहे. म्हणूनच 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे महात्मा गांधी यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई होते.

महात्मा गांधींचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. गांधी जयंतीनिमित्त तुम्ही देखील Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास गांधी जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच

माझा धर्म आहे ‘सत्य’

हा माझा देव आहे आणि

‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti 2024 Messages 1 (Photo Credit - File Image)

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,

नंतर तुमच्यावर हसतील,

नंतर भांडतीलही; पण

सरतेशेवटी विजय तुमचाच असेल

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gandhi Jayanti 2024 Messages 2 (Photo Credit - File Image)

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर

बलवानांचे शस्त्र आहे

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gandhi Jayanti 2024 Messages 3 (Photo Credit - File Image)

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,

पण ह्रदय हवे

ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti 2024 Messages 4 (Photo Credit - File Image)

तुम्ही मला कैद करू शकता,

माझा छळ करू शकता,

माझे शरीर नष्ट करू शकता

पण माझ्या मनाला कैद

करू शकणार नाहीत

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gandhi Jayanti 2024 Messages 5 (Photo Credit - File Image)

देशाला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यात बापूंनी दिलेले अभूतपूर्व योगदान, संघर्ष आणि बलिदान कोणीही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळेच या दिवशी देशभरातील शाळांसह प्रत्येक लहान-मोठ्या ठिकाणी प्रार्थना सभा, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रियजनांना वरील शुभेच्छापत्र पाठवून बापूच्या स्मृतींना अभिवादन करू शकता.