Merry Christmas 2023 Messages: ख्रिसमस निमित्त सोशल मीडियावर Images, Greetings, Quotes, Wishes शेअर करून साजरा करा नाताळ सण!
तुम्ही देखील ख्रिसमस निमित्त सोशल मीडियावर Images, Greetings, Quotes, Wishes शेअर करून नाताळ सणाचा आनंद द्वगुणित करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Merry Christmas 2023 Messages: ख्रिसमस (Christmas 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस तुम्ही तुमचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे करता. आनंदाने भरलेल्या या सणावर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटवस्तू देता. 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सण असला तरी सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक तो उत्साहाने साजरा करतात. (Christmas 2023: 'सांताक्लॉज', 'ख्रिसमस ट्री'चा इतिहास काय आहे? जाणून घ्या या उत्सवाची सुरुवात कशी झाली)
ख्रिसमसचा इतिहास येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जोडलेला आहे. ज्याची नोंद बायबलमध्ये करण्यात आली आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता आणि म्हणून या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियावर तसेच प्रत्येक्षात भेटून नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील ख्रिसमस निमित्त सोशल मीडियावर Images, Greetings, Quotes, Wishes शेअर करून नाताळ सणाचा आनंद द्वगुणित करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Best Places To Visit For Christmas Celebration: ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील सर्वोत्तम)
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रभूचा आशिष अवतरला,
नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या
प्रेमच प्रेम भरभरुनी
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, सत्य, दया,
संदेश देणाऱ्या
नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस…
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!!!
या नाताळच्या सणाला
तुमचं जीवन ख्रिसमस ट्रीप्रमाणे हिरवंगार
आणि भविष्य चांदण्यंप्रमाणे चमचमणारं राहो.
मेरी ख्रिसमस!!!
ख्रिसमस हे प्रेम आहे,
ख्रिसमस आनंद आहे,
ख्रिसमस उत्साह आहे,
ख्रिसमस नवी उमेद आहे.
तुम्हा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. 25 डिसेंबरपासून दिवस मोठा होऊ लागतो. म्हणून हा दिवस सूर्याचा पुनर्जन्म मानला जातो. म्हणूनच युरोपियन लोक 25 डिसेंबरला सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी सण साजरा करत असत.