Shiv Jayanti 2024 Wishes In Marathi: शिवजयंती निमित्त Messages, Greetings, Whatsapp Status, Images शेअर करुन साजरा करा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस!
यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Shiv Jayanti 2024 Wishes In Marathi: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकात पहिले हिंदू साम्राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा फुले यांनी 1870 मध्ये केली. या परंपरेची सुरुवात म्हणून पुण्यात पहिली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मराठा राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज हे त्यांच्या प्रशासन, धैर्य आणि युद्धकौशल्यासाठी ओळखले जातात. शिवजयंती निमित्त Messages, Greetings, Whatsapp Status, Images द्वारे तुम्ही शिवभक्तांना खास मराठमोळे शुभेच्छापत्र पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Shivneri Festival 2024: शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा'चे आयोजन; संगीत, नृत्य, नाट्य, गिर्यारोहणसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता..
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
टिळकांनी 1894 मध्ये राष्ट्रीय प्रबोधनासाठी गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव सुरू केला. शिवाजी उत्सव 1894 मध्ये रायगड किल्ल्यावरून सुरू झाला. 1896 मध्ये गणेशोत्सवाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले.