Buddha Purnima 2022 Wishes In Marathi: बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Quotes, WhatsApp Status, Facebook Images द्वारा शेअर साजरी करा वैशाख पौर्णिमा

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना मराठमोळे मेसेजेस, ग्रीटिंग्स द्वारा देण्यासाठि खास शुभेच्छापत्र

Buddha Purnima। file Photo

वैशाख पौर्णिमेचा (Vaishakh Purnima) दिवस बौद्ध धर्मियांसाठी खास असतो. या दिवशी गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांची जयंती बुद्धपौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार बुद्ध जयंती सोमवार 16 मे 2022 दिवशी साजारी केली जाणार आहे. या दिवसाचं औचित्य साधून जगाला दया, क्षमा, शांती यांची शिकवण देणार्‍या गौतम बुद्धांसमोर नतमस्तक होत तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना गौतम बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस,Wishes, HD Images शेअर करायला विसरू नका. सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status, GIFs द्वारा शुभेच्छा संदेश तुम्ही देऊ शकता.

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून देखील ओळखले जाते. नक्की वाचा: Buddha Purnima 2022 Date: गौतम बुद्धांच्या जयंतीची तारीख, तिथी आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या .

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Buddha Purnima। file Photo

नमो बुद्धाय

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Buddha Purnima। file Photo

प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे

भगवान बुद्धांची दिशा,

आजच्या मंगलमय दिनी आम्ही करतो

तुमच्या खुशाली ची आशा

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima। file Photo

बुद्ध पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या

आयुष्यातले दुःख दूर करून

सुख शांती आणि समाधान

घेऊन येवो हीच आमची कामना

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima। file Photo

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश

महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश

नाकारले राजपुत्र असून युद्ध

असे होते तथागत गौतम बुद्ध

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima। file Photo

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणार्‍या

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणार्‍या

गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन

इ.स.पू. 563 मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला.या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना व प्रसार केला. आज भारताप्रमाणेच जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी 'बौद्ध पौर्णिमा' साजरी केली जाते