Buddha Purnima Quotes in Marathi: गौतम बुद्ध यांचे सकारात्मक विचार WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करत साजरी करा बुद्ध पौर्णिमा

Buddha Purnima 2021 Quotes, Positive Thoughts शेअर करत साजरा करा यंदाचा गौतम बुद्ध जयंतीचा दिवस

Gautam Buddha Quotes । File Photo

Buddha Purnima Quotes in Marathi: बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) ही गौतम बुद्ध जयंती (Gautam Buddha Jayanti) किंवा बौद्ध धर्मियांचा सण वेसक (Vesak)  या नावाने देखील साजरा केला जातो. यंदा ही बौद्ध पौर्णिमा बुधवार, 26 मे दिवशी आहे. जगभरात या दिवशी बुद्ध धर्मीय गौतम बुद्ध यांनी दिलेल्या शिकवणीचं स्मरण करतात. त्यांचे आचार विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी कटिबद्ध होता. जगाला प्रेम, शांती, अहिंसा अशा बहुमोल विचारांची ठेवण देणार्‍या गौतम बुद्धांच्या अनुयायींसाठी हा दिवस खास आहे. मग त्यांच्यासोबतच समजात इतरांना, पुढच्या पिढीला देखील गौतम बुद्धांच्या विचारांचा ठेवा मिळावा म्हणून त्यांचे QUOTES सोशल मीडीयात शेअर करण्यासाठी आजच्यापेक्षा अधिक चांगला दिवस कोणता असू शकेल? आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी Facebook, WhatsApp, Instagram, Twitter सह इतर सोशल मीडीया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्की शेअर करा गौतम बुद्धांचे विचार. Buddha Purnima Messages 2021: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, WhatsApp Status शेअर करुन साजरी करा बुद्ध जयंती!

दरम्यान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना बुद्ध पौर्णिमा या एकाच दिवशी घडल्या आहेत. भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया मध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गौतम बुद्ध यांचे सकारात्मक विचार 

Gautam Buddha Quotes । File Photo

 

 

आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल.-गौतम बुद्ध

Gautam Buddha Quotes । File Photo

 

एक क्षण एक दिवस बदलू शकतो,

एक दिवस आयुष्य बदलू शकतो

आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो.

- गौतम बुद्ध

Gautam Buddha Quotes । File Photo

तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक कवटाळून ठेवलेले असतं - गौतम बुद्ध

Gautam Buddha Quotes । File Photo

चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. - गौतम बुद्ध

Gautam Buddha Quotes । File Photo

सर्वात गडद रात्र म्हणजे तुमचे अज्ञान - गौतम बुद्ध

बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात. बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. सिद्धार्थांनी घराचा त्याग केल्यानंतर सत्याच्या शोधासाठी 7 वर्ष कठोर तपश्चर्या आणि साधना केली. त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व अर्थात ज्ञानप्राप्‍ती झाली असे सांगितले जाते. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. आणि दरवर्षी सेलिब्रेशनला सुरूवात झाली. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन आहे.