Diwali 2020: दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेचे निर्बंध; राज्यातही आतषबाजीवर बंदी येण्याची शक्यता

या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रही यंदा फटाके फोडण्याच्या निर्णयावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Mumbai | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिवाळी (Diwali ) आणि फटाके (Firecrackers ) यांचे गेल्या अनेक वर्षांचे अतूट नाते. परंतू, मुंबईकरांना मात्र यंदाची दिवाळी फटाक्यांविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे. बीएमसीने (BMC ) घातलेल्या निर्बंधांनुसार मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी (BMC Bans Firecrackers घालण्यात आली आहे. बंदी असतानाही जर फटाके फोडले तर मुंबई महापालिका पोलिसांच्या मदतीने तुमच्यावर कारवाई करु शकते. दरम्यान, केवळ मुंबईच नव्हे तर राज्यभरातही बंदी घातली जाऊ शकते. पर्यावरण आणि कोरोना व्हायरस या दोन्हीचा विचार करता यंदा फटके फोडण्यावर निर्बध घातले जावेत असा विचार राज्य सरकार करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत असा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेन आपल्या निर्बंधांमध्ये म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे अथवा फटाक्यांची आतषबाजी करणे या प्रकारांना बंदी आहे. जर नियमांचे उल्लंघन झाले आणि कोणी नागरिक फटाके फोडताना आढळले तर त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यात येईल, असे या निर्बंधांमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Rajasthan Govt Banned Firecrackers: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांच्या विक्रीवर व आतषबाजीवर बंदी)

Firecrackers | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दरम्यान, राजस्थान, ओडिशा, सिक्कीम यांसारख्या राज्यांनी दिवाळीत फटाके फोडण्यावर यापूर्वीच निर्बंध घातले आहेत. या राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रही यंदा फटाके फोडण्याच्या निर्णयावर बंदी घालण्याची शक्यता आहे.

फटाके फोडल्यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात धुर आणि रासायनिक पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. कोरोना व्हायरस संसर्गाच्या काळात नागरिकांना श्वसनाच्या त्रासांना सामोरे जावे लागू नये असा राज्याच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यातूनच फटाके फोडण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif