Bhim Jayanti 2022 Wishes In Marathi: भीम जयंती च्या मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत अभिवादन करा महामानवाला

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 1928 साली पुण्यात जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी सार्वजनिकरित्या पहिल्यांदा साजरी केली.

भीम जयंती । PC: File Photo

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा भीम जयंती (Bheem Jayanti) म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 दिवशी झाला होता. यंदा बाबासाहेबांची 131 वी जयंती साजरी केली जाणार आहे. मग या महामानवाला अभिवादन व्यक्त करण्यासाठी देशापरदेशातून भीम अनुयायी मुंबईत चैत्यभूमीवर दाखल होतात. यंदा कोरोना संकट शमल्याने मोठ्या उत्साहात पूर्वीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे. मग या दिवशी भीम अनुयायांना भीम जयंती 2022 च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, मेसेजेस, Quotes, Greetings, WhatsApp Status, HD Wallpaper याच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी ही शुभेच्छापत्र नक्की डाऊनलोड करू शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. यामधून बाबासाहेबांच्या विचारांचा वसा पुढल्या पिढीला दिला जातो. समाजात त्यांच्या विचारांना पुनरूज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे देखील नक्की वाचा: Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास Images, Messages, Wishes च्या माध्यमातून शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार.

भीम जयंती शुभेच्छा मराठी संदेश

भीम जयंती । PC: File Photo

भीम अनुयायींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा!

भीम जयंती । PC: File Photo

सागराचं पाणी आटणार नाय

भीमाचे उपकार पुढील हजार जन्मातही

आमच्याकडून फिटणार नाय

भीम जयंती निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा

भीम जयंती । PC: File Photo

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..

भीम जयंतीच्या शुभेच्छा

भीम जयंती । PC: File Photo

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

भीम जयंती । PC: File Photo

मान वर करून जगायला शिकवलं ज्याने

शिक्षणाचे महत्व समजावले ज्याने

अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,

त्या आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना

भीम जयंती निमित्त अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 1928 साली पुण्यात जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी सार्वजनिकरित्या पहिल्यांदा साजरी केली.आता ही परंपरा झाली आहे. भीम अनुयायींप्रमाणेच राजकीय स्तरावर दरवर्षी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राष्ट्रीय पक्षांचे नेते संसद, नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करतात.

Tags

131 Birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar Ambedkar Jayanti Ambedkar Jayanti 2022 Ambedkar Jayanti 2022 Celebrations Ambedkar Jayanti 2022 greetings Ambedkar Jayanti 2022 Images Ambedkar Jayanti 2022 Messages Ambedkar Jayanti 2022 Quotes Ambedkar Jayanti banner Ambedkar Jayanti Greetings Ambedkar Jayanti History Ambedkar Jayanti Images Ambedkar Jayanti Messages Ambedkar Jayanti photos Ambedkar Jayanti quotes Ambedkar Jayanti Wishes Ambedkar Jayanti Wishes in Marathi anniversary of Babasaheb Ambdkar Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar Birth Anniversary Babasaheb Ambedkar Jayanti Bhim Jayanti Bhim Jayanti 2022 Bhim Jayanti Shubhecha bhim jayanti shubhechha Bhim Jayanti Wishes Dr B R Babasaheb Ambedkar Dr BR Ambedkar Birth Anniversary Dr BR Ambedkar Jayanti 2022 Dr BR Ambedkar Jayanti Date Dr BR Ambedkar Jayanti Significance Dr. Babasaheb Ambedkar Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Messages In Marathi Dr. Babasaheb Ambedkar Quotes Dr. BR Ambedkar Dr. BR Ambedkar Jayanti Happy Ambedkar Jayanti Happy Ambedkar Jayanti Images Happy Ambedkar Jayanti Photos statue of Dr BR Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंंबेडकर जयंंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंंबेडकर जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती 2022 बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा