Bhaubeej Special Rangoli 2019: भाऊबीज निमित्त बहीण भावाची डिझाईन असणारी रांगोळी काढून द्या तुमच्या भाऊरायाला सरप्राईझ (Watch Video)

छोट्या जागेत ही डिझाईन होऊ शकत असल्याने तुम्हाला फक्त रांगोळी, रंग आणि खडू इतकीच जमवाजमव करायची आहे. चला तर मग पाहुयात या काही सोप्प्या भाऊबीज विशेष रांगोळी डिझाइन्स..

Bhaubeej Special Rangoli Designs (Photo Credits: youtube)

Diwali 2019:आज 29 ऑक्टोबर रोजी  दिवाळीचा शेवटाचा दिवस म्हणजेच भाऊबीज (Bhaubeej). बहीण- भावाच्या नात्यातील सुंदर क्षण टिपणाऱ्या अशा या दिवशी यादिवशी बंधुरायाला ओवाळून बहिणाबाई त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते अशी रीत आहे. भाऊबीजेला 'यमद्वितीया'(Yamdwitiya) असे सुद्धा म्हटले जाते. हिंदू पुराणानुसार, या दिवशी यमाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार देऊन भोजनाचा आस्वाद घेतला. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. पण हे स्नान प्रत्येकवेळीच शक्य होईल असे नाही, त्यामुळे निदान बहिणीच्या सोबत या दिवसाचा आनंद लुटला तरी मानसिक स्वास्थ्यासाठी पुरेसा ठरतो. आता तुमचा भाऊ घरी येणार म्हणजे त्याच्या स्वागताला काहीतरी खास करायला हवे ना? चिंता करू नका.. आमच्याकडे एक कल्पना आहे, यावेळेस तुमचा भाऊ दारात येताच क्षणी त्याचे लक्ष वेधले जाईल अशी एक खास रांगोळी काढून तुम्ही स्वस्त आणि गोड सरप्राईझ देऊ शकता.

भाऊबीज स्पेशल रांगोळीसाठी  भाऊ बहिणीची  डिझाईन काढून त्यात रंग भरणे ही सोप्पी कल्पना आपल्याला फॉलो करायची आहे.  छोट्या जागेत ही डिझाईन होऊ शकत असल्याने तुम्हाला फक्त रांगोळी, रंग आणि खडू इतकीच जमवाजमव करायची आहे. चला तर मग पाहुयात या काही सोप्प्या भाऊबीज विशेष रांगोळी डिझाइन्स..

Bhaubeej 2019: भाऊबीजेला 'या' वेळेत करा बंधुरायाची ओवाळणी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

याशिवाय भाऊबीजेच्या शुभेच्छा देणारा मजकूर लिहून त्याबोवती सुद्धा आपण रांगोळीची सजावट करू शकता पहा कशी

भाऊबीजेला दारात काढण्यासाठी छोटी रांगोळी

रांगोळी ही एक सजावटीपुरती गोष्ट नसून त्यामागे अनेक धार्मिक अर्थ देखील लपले आहेत. असं म्हणतात की रांगोळीतील रंग आणि आकार हे मनाला सकारात्मक बनवण्यात मदत करतात. त्यामुळे तुमची अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्ही वरील व्हिडीओजचा वापर करू शकता. आणि हो तुमच्या या हटके आमच्यासोबत शेअर करायाला विसरू नका