Bhaubeej 2019: भाऊबीजेला 'या' वेळेत करा बंधुरायाची ओवाळणी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

आजच्या या खास दिवशी एक खास मुहूर्त पाळून भाऊरायाला ओवाळल्यास त्याचा आणखीन लाभ होऊ शकतो.या ओवाळणीचा मुहूर्त आणि योग्य पद्धत काय असावी याबाबत जाणून घ्या..

भाऊबीज 2019 (संग्रहित, संपादित प्रतिमा)

Diwali 2019: भाऊ- बहिणीच्या नात्यात गोडवा आणणारा आजचा दिवस म्हणजेच भाउबीज (Bhaubeej). कार्तिक मासातील शुक्ल पक्ष द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. असं म्हणतात की या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व निर्माण होते त्यामुळे या दिवशी बहिणरूपी स्त्रीच्या सानिध्यात राहिल्याने, तिने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने भावाला लाभ होतात. काही भागांमध्ये या दिवशी बहिणी आपल्या भावाला तेल लावून त्यांना स्‍नानदेखील घालते. या दिवशी बहिणीने भावाचे औक्षण करण्याची परंपरा आहे. सणाचा दिवस हा मुळातच शुभ असतो त्यामुळे साधारणतः सकाळी अभ्यंगस्नान केल्यावर भावाला ओवाळण्याची पद्धत आहे. मात्र या दिनी एक खास मुहूर्त पाळून ओवाळणी केल्यास त्याचा आणखीन लाभ होऊ शकतो.

Happy Bhaubeej 2019 Messages: भाऊबीज निमित्त मराठी ग्रीटिंग्स, SMS, Messages, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्या आपल्या भावंडांना खास शुभेच्छा

चला तर मग या ओवाळणीचा शुभ मुहूर्त आणि योग्य पद्धत काय असावी याबाबत जाणून घेऊयात.

भाऊबीज शुभ मुहूर्त

तिथी: 29 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 6. 13 पासून ते 30 ऑक्टोबर सकाळी 3.48 मिनिटांपर्यंत

भाऊबीज ओवाळणी मुहूर्त: 1 वाजून 11 मिनिटांपासून ते 3 वाजून 25 मिनिटांपर्यंत

भाऊबीजेला ओवाळण्याची पद्धत

भाऊबीजेच्या दिवशी अंघोळ करून नवे कपडे परिधान करावे. या दिवशी बहीण भावाने ओवाळणी होईपर्यंत वृत्तसंकल्प घ्यावा.या दिवशी यमद्वितीया असल्याने यम, यमुना, चित्रगुप्‍त आणि यमदूतांचे पूजन करावे. आता भावाला टिळक लावून त्याला ओवाळावे. सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू घेऊन त्याने ओवाळल्यास फायदेशीर ठरते. ओवाळणी झाल्यावर भाऊ बहिणीने एकत्र जेवण केले पाहिजे.

हिंदू पुराणानुसार, भाऊबीजेच्या मागे एक खास कथा आहे. भाऊबीजेला 'यमद्वितीया' असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी यमाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार देऊन भोजनाचा आस्वाद घेतला. म्ह्णूनच या सणाला या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात, म्हणजे तसे करणाऱ्याला त्यावर्षी यमापासून भय नसते.पण आपल्याला काही हे स्नान प्रत्येकवेळीच शक्य होईल असे नाही, त्यामुळे निदान बहिणीच्या सोबत राहून या दिवसाचा आनंद लुटला तरी मानसिक स्वास्थ्यासाठी पुरेसा ठरतो.