Benefits of Morning Sex: पहाटेच्या वेळी संभोग केल्यास सेक्स लाईफमध्ये होतील 'हे' चांगले बदल
थकवा निघून गेलेला असतो. अशा वेळी तुम्ही सकाळच्या वेळी सेक्स केल्यास अनेक चांगले फायदे शरीराला देखील होतात.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुषांमध्ये रोज शारीरिक संबंध ठेवणे तर सोडा मात्र अधूनमधून सेक्स करायची देखील इच्छा उरत नाही. दिवसभराच्या रहाटगाड्यानंतर शरीर इतके थकून गेलेले असते की रात्री अंथरुणात पडल्या पडल्या अनेकांना झोप लागते. अशा वेळी अनेकांच्या सेक्स करण्यास वेळ मिळत अशा तक्रारी असतात. अशा वेळी कित्येकांना प्रश्न पडलेला असतो सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती? अशा परिस्थितीत शरीराचा विचार करता सेक्स करण्याची योग्य वेळ ही सकाळची आहे. कारण पहाटेच्या वेळी अनेकांना काही काळासाठी का होईना पण झोप पूर्ण झालेली असते. त्यात त्यांना एकमेकांना भरपूर वेळ द्यायवा मिळतो. त्यामुळे सेक्स करण्याची योग्य वेळ ही सकाळची ठरू शकते असे म्हणायला हरकत नाही.
रात्री झोप पूर्ण झाल्याने सकाळी आपले शरीर, मन एकदम रिफ्रेश झालेले असते. थकवा निघून गेलेला असतो. अशा वेळी तुम्ही सकाळच्या वेळी सेक्स केल्यास अनेक चांगले फायदे शरीराला देखील होतात.हेदेखील वाचा- Sex Drive Foods: सेक्सची इच्छा कमी झाली आहे? 'या' काही पदार्थांचे सेवन करून वाढवा तुमचा सेक्स ड्राइव्ह
1. तणावमुक्त होता
सकाळच्या वेळी सेक्स केल्यास सर्वात मोठा फायदा होतो तो म्हणजे तुम्ही तणावमुक्त होता. तुमचे शरीर रात्रीच्या झोपेने खूप रिलॅक्स झालेले असते अशा वेळी तुम्ही सकाळी सेक्स केल्यास शरीरास चांगले फायदे होतात.
2. तुम्ही दिवसभराच्या कामासाठी तयार होता
सकाळी सेक्स केल्यास कामावर निघण्याआधी सेक्समुळे तुमचे सक्रिय झालेले असते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी चांगली ऊर्जा मिळते. एस्ट्रोजन आणि टेस्टास्टेरोनचा स्तर हा यादरम्यान चांगला असतो. यात हार्मोनल स्तर जितका अधिक असेल तितकी तुमच्या शरीरात ऊर्जा बनते.हेही वाचा- Sex Tips: सेक्सनंतर पुरुषांनी आपल्या महिला पार्टनरसोबत न विसरता करा 'या' गोष्टी जे व्यक्त करेल तुमचे तिच्यावरील जिवापाड प्रेम
3. वजन घटविण्यास मदत
सकाळच्या वेळी व्यायाम केलेला चांगला असतो. त्यामुळे सेक्स दरम्यान तुमचा एक प्रकारचा व्यायाम होत असल्याकारणाने तुमचे शरीरातील कॅलरीज घटविण्यास मदत होते.
4. तुमचा मूड आणि इम्यून सिस्टम वाढवतो
सेक्सदरम्यान शरीरात एंडोर्फिन निघतात. ज्या सकाळी सकाळी आपल्या मूडला चांगला बनविण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे सकाळी जर तुम्ही सेक्स दरम्यान ऑर्गेज्मपर्यंत पोहोचलात तर जास्त आनंदी व्हाल. याशिवाय विषाणू आणि व्हायरस पासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी प्रतिरोधक क्षमता वाढवली जाते.
5. तुमच्यातील तारुण्य निखरण्यास मदत करतात
सकाळच्या वेळी सेक्स केल्यास तुमचे तारुण्य आणखी निखरण्यास मदत होते. कारण यादरम्यान तुमच्या चेह-यांवरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण सकाळी सेक्स दरम्यान शरीरात ऑक्सीटोसिन, बीटा-एंडोर्फिन आणि इतर हार्मोन्स तयार होतात. एक सर्वेक्षणानुसार, जी जोडपी आठवड्यातून तीनदा सकाळचे सेक्स करतात ते कमी सेक्स करणा-यांच्या तुलनेत कमी वयाचे दिसतात.
हे ऐकण्यास थोडे विचित्र वाटत असले तरीही मुख्य गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळी सेक्स करणे शरीरास जितके चांगले असते तितकी तुमच्या सेक्स लाईफ चिरतरुण ठेवण्यासाठी आणि आणखी बहरण्यासाठी मदत होते.