Maharashtra Bendur : काय आहे बेंदूर सण? जाणून घ्या महाराष्ट्रातील या अनोख्या सणाचं महत्व आणि वैशिष्ट
शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
Maharashtrian Bendur 2022: ‘बेंदूर’ (Bendur) हा सण प्रमुख्याने पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) सीमेवरील जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो. तर महाराष्ट्रातील इतर भागात या सणाला ‘पोळा’ (Pola) म्हणतात. बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे फक्त दिवस वेगवेगळे आहेत. आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान बेंदूर साजरा केला जातो. शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातलं जातं. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून त्यांची सजावट करतात. याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
बैलांच्या मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. संध्याकाळी बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. (हे ही वाचा:-Ashadhi Ekadashi 2022 Images: आषाढी एकादशीच्या Messages Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या मंगलमय शुभेच्छा)
बेंदूर याचं सणाला विदर्भात पोळा म्हणतात फक्त तो साजरा करण्याची तीथी वेगळी असते. पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील (Vidarbh) सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश (Madhya Pradesh) व तेलंगण (Telangana) सीमाभागातही हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पोळा सण साजरा केला जातो तर आषाढ महिन्यातील पौर्णिमेदरम्यान बेंदूर साजरा करण्यात येतो.