Bakri Eid 2020: बकरी ईद निमित्त का दिली जाते कुर्बानी? जाणून घ्या Eid-ul-Adha चे महत्त्व
त्यामुळे यंदा सौदी अरेबिया मध्ये 31 जुलै तर भारतात 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदचा जश्न सेलिब्रेट करण्यात येईल
Significance of Eid-Al-Adha: यंदा बकरी ईद संपूर्ण देशभरात 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. इस्लाम कॅलेंडरनुसार, 12 व्या महिन्यातील 10 तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. त्यामुळे यंदा सौदी अरेबिया मध्ये 31 जुलै तर भारतात 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदचा जश्न सेलिब्रेट करण्यात येईल. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद साजरी केली जाते. रमजान ईद प्रमाणेच बकरी ईद ही देखील इस्लाम धर्मियांचा खास सण आहे. (Bakrid 2020 Mubarak: बकरीदच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश, Wishes, Messages शेअर करून द्विगुणित करा ईद उल-अजहा चा आनंंद)
बकरी ईदचे महत्त्व:
बकरीद चा दिवस हा फर्ज-ए-कुर्बानी चा दिवस असतो. इस्लाम धर्मात मुस्लिम आणि गरीब यांची विशेष काळजी घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे बकरी ईदला गरीबांकडे विशेष लक्ष पुरवले जाते. या दिवशी कुर्बानीनंतर गोशचे तीन भाग केले जातात. एक भागस्वतःसाठी ठेवण्यात येतो. तर बाकी दोन भाग गरीब आणि गरजूंमध्ये वाटले जातात. स्वतःच्या जवळीची वस्तू अल्लाहच्या नावे गरीबांना दान करणे, कुर्बान करणे हा यामागील संदेश आहे.
बकरी ईद का साजरी केली जाते?
इस्लाम धर्मियांमध्ये बकरी ईदचे विशेष महत्त्व आहे. इस्लामिक मान्यतेनुसार, हजरत इब्राहिम यांनी आपला लहान मुलगा हजरत इस्माइल याला खुदाच्या हुकूमावरुन कुर्बान केले होते. त्यानंतर हजर इब्राहिमचा त्याग पाहून खुदाने त्याच्या मुलाला जीवनदान दिले. त्यामुळे हजरत इब्राहिम यांच्या त्यागाची आठवण म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. त्यानंतर अल्लाहच्या हुकूमानुसार माणसांऐवजी जनावरांची कुर्बानी देण्याचा इस्लामिक कायदा सुरु करण्यात आला.
बकरी ईद दिवशी कुर्बानी का दिली जाते?
हजरत इब्राहिम यांनी जेव्हा कुर्बानी दिली तेव्हा पितृत्वाची भावना आड येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्यानंतर जेव्हा त्यांनी डोळ्यावरुन पट्टी काढली तेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्या समोर जिवंत उभा होता आणि मरण पावलेले जनावर त्याजागी पडले होते. त्यामुळे बकरी ईद दिनी कुर्बानी देण्याची प्रथा सुरु झाली.
रमजान ईद आणि बकरी ईद हो मुस्लिम बांधवांचे महत्त्वपूर्ण सण आहे. कुर्बानीचा उत्सव म्हणून बकरी ईद सर्वत्र अगदी उत्साहात साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे काही नियमांचे पालन करत हा सण साजरा करावा लागणार आहे.