Bakri Eid 2019: का साजरी केली जाते बकरी ईद? जाणून घ्या यामागच्या त्यागाची आणि बलिदानाची कथा
बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बक-याचा बळी दिला जातो.
Eid al-Adha 2019: मुस्लिम बांधवांना वर्षातील 2 महत्त्वाचे सण म्हणजे एक रमाजान ईद (Ramadan Eid) आणि बकरी ईद. हे दोन्ही सण मुस्लिम बांधवांसाठी खूप महत्त्वाचे आणि विशेष मानले जातात. येत्या 12 ऑगस्टला देशभरात बकरी ईद (Bakra Eid) हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जाईल. बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बक-याचा बळी दिला जातो. मात्र यामागे एकच उद्देश असतो की, प्रत्येक मनुष्याने आपले जीवन हे ईश्वराची देणगी आहे असे समजावे, त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी नेहमी तयारी दर्शवली पाहिजे.
का साजरी केली जाते 'ईद-उल-जुहा'
'ईद उल जुहा' चा अर्थ म्हणजे 'बलिदानाची ईद'. इस्लाम धर्मावर ज्यांची आस्था आहे त्यांच्यासाठी हा प्रमुख पर्व आहे. हा पर्व रमजानच्या नंतर जवळपास 70 दिवसांनी साजरा केला जातो. मुस्लिम मान्यता के अनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल ला याच दिवशी अल्लाह च्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाह ने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पर्व साजरा केला जातो.
काय आहे बलिदानाची कहानी:
ईद उल जुहा चे पर्व हिजरीच्या अंतिम महिन्यात जुल हिज्ज मध्ये साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील मुसलमान मक्का (साउदी अरब) मध्ये एकत्र येऊन हज साजरी करतात. ईद उल जुहा चा अर्थ त्यागाची ईद असा आहे. या दिवशी जनावराचा बळी देणे एक प्रकारची प्रतिकात्मक बलिदान आहे.
हजरत इब्राहिमच्या कुटूंबामध्ये त्यांची पत्नी हाजरा आणि मुलगा इस्माइल असे दोघेच होते. असे सांगितले जाते की, अल्लाह ने हजरत इब्राहिमला त्याच्या मुलाला ईश्वराच्या मार्गावर बलिदान करण्याचा आदेश दिला होता. जेव्हा हजरत इब्राहिम तसे करण्यास गेले तेव्हा अल्लाह त्यांना इस्माइलच्या जागेवर कोणत्या तरी जनावराला बळी देण्यास सांगितले. या बलिदानाचा अर्थ असा आहे की, स्वत: चे सुख विसरून मानवताची सेवा करा. ईश्वराच्या मूळ आदेशाला समजल्यानंतर हजरत इब्राहिम ने आपल्या मुलाला आणि पत्नी हाजरा ला मक्कामध्ये वसविण्याचा निर्णय घेतला.
बकरीद चा बक-याशी काही संबंध नाही
या शब्दाचा बक-यांशी काही संबंध नाही. वास्तविक अरबीमध्ये 'बकर' शब्दाचा अर्थ आहे मोठे जनावर ज्याला कापले जाते. त्याचेच स्वरुप आहे 'बकरा ईद'. ज्याला पाकिस्तान आणि बांग्लादेशात मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.
बक-यांना तीन भागात विभागले जाते
'ईद-ए-कुर्बां' चा अर्थ आहे बलिदानाची भावना. यात बक-याला तीन भागात विभागले जाते. ज्यात पहिला हिस्सा हा गरीबांसाठी, दुसरा हिस्सा नातेवाईक आणि आप्तलगांसाठी आणि तिसरा हिस्सा स्वत:साठी ठेवला जातो.
(सूचना- या लेखात दिली गेलेली माहिती ही प्रचलित मान्यतांच्या आधारावर दिली गेली आहे. ही लेखकाचे वैयक्तिक मत आहे. याचे वास्तविकता आणि विशिष्ट परिणामांची आम्ही काही शाश्वती देत नाही. याविषयी प्रत्येकाचे विचार किंवा मत हे वेगवेगळे असू शकते.)