Bail Pola Wishes In Marathi: बैलपोळा सणाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता
ग्रामीण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण आजही तितक्याच श्रद्धेने आणि परंपरेने साजरा केला जातो, जो माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याची आठवण करून देतो.
महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असून पारंपरिक शेतीत बैल हे शेतकऱ्याचे सर्वात मोठे साथीदार मानले जातात. नांगरणी, पेरणी, मळणी अशा सर्व कामांत बैल शेतकऱ्याला मदत करतात. वर्षभर अपार कष्ट करणाऱ्या या बैलांना एक दिवस पूर्ण विश्रांती देऊन त्यांची पूजा करणे, त्यांना सजवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच या सणाचा मूळ उद्देश आहे. श्रावण महिन्यातील अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा केला जातो. मग या सणाचं औचित्य साधत बैलपोळ्याच्या शुभेच्छा तुम्ही देखील WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Images च्या माध्यमातून शेअर करत आनंद द्विगुणित करू शकाल.
आधुनिक यंत्रयुगात ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांच्या वापरामुळे शेतीत बैलांचा वापर कमी होत चालला आहे. यामुळे काही भागांत बैलपोळ्याऐवजी 'ट्रॅक्टर पोळा' साजरा करण्याची नवी पद्धतही रूढ होताना दिसते. मात्र तरीही ग्रामीण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण आजही तितक्याच श्रद्धेने आणि परंपरेने साजरा केला जातो, जो माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याची आठवण करून देतो.
बैल पोळ्याच्या शुभेच्छा




बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना पहाटेच नदी किंवा तलावावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालतात. त्यानंतर बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी रंग लावला जातो, शिंगांना बेगड आणि रंग लावून सजवले जाते, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि नवीन झुली घातल्या जातात. बैलांच्या पायात चांदीचे किंवा इतर दागिनेही घातले जातात.
सजवलेल्या बैलांची घरोघरी पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि औक्षण केले जाते. त्यानंतर गावातील सर्व बैलजोड्यांची एकत्र मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक गावातून फिरते आणि यावेळी संपूर्ण गाव उत्सवाच्या वातावरणात न्हाऊन निघते.
(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2026 07:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

