Bail Pola Wishes In Marathi: बैल पोळा शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करून साजरा करा पिठोरी अमावस्येचा दिवस!

Bail Pola Wishes | File Images

शेतकरी बांधवांचा जीवा-भावाचा सोबती म्हणजे बैल. हिंदू परंपरेनुसार, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात पोळा साजरा केला जातो. त्यापैकी श्रावणी अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्येचा (Pithori Amavasya) दिवस हा बैल पोळा म्हणून साजरा केला जातो. यंदा श्रावणी अमावस्येचा बैल पोळा (Bail Pola) महाराष्ट्रात 6 सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. या बैलपोळ्याच्या निमित्त कृषी प्रधान आपल्या भारतातील महाराष्ट्रातील शेतकरी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आता शेतीच्या कामांसाठी बैलांच्या जोडीने अनेक यंत्र आली असली तरीही अन्नदाता शेतकरी आणि त्याचा बैल यांच्या मेहनतीला तोड नाही त्यामुळे आज बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसोबत तुम्ही देखील बैलांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोशल मीडीयात फेसबूक मेसेजेस, Quotes, Wishes, HD Images द्वारा बैलपोळ्याच्या शुभेच्छा देणारी मराठी शुभेच्छापत्र व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, ट्वीटर, टेलिग्राम द्वारा शेअर करू शकता.

बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांचं पूजन केले जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम दिला जातो. या माध्यमातून बैलांच्या प्रती बळीराजा आपली कृतज्ञता अर्पण करत असतो.

बैलपोळ्याच्या शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले

फेडा उपकाराचं देनं...

बैला, खरा तुझा सन

शेतकऱ्या तुझं रीन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes | File Images

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई

एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा

सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Wishes | File Images

शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes| File Images

बैल पोळ्याच्या खूप खूप  शुभेच्छा

Bail Pola Wishes| File Images

दरम्यान ज्यांच्याकडे बैल नाही ते शेतकरी बैल्याच्या पुतळ्याची पूजा करतात आणि बैलपोळ्याचा सण साजरा करतात. सकाळी बैलांचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी बैलांच्या मिरवणूका काढण्याची देखील पद्धत आहे. सगळ्यात वयस्कर बैलाला आंब्याच्या पानांचा मुकुट चढवला जातो, बैलपोळ्याची गाणी म्हणत मग संपूर्ण गावात नाचत बैल फिरवले जातात. काही गावामध्ये पूर्वी या दिवशी बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जात असे. सध्या बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.