Bail Pola Wishes: बैल पोळ्या मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून शेअर करून व्यक्त करा बैलांप्रती कृतज्ञता!
आज आपला अन्नदाता असणार्या शेतकर्याच्या साथीदार, बैलांप्रती तुमची कृतज्ञता सोशल मीडीयामध्ये मराठमोळे मेसेजेस, शुभेच्छा, बैल पोळ्याचे व्हॉट्सअॅप स्टेट्स (Bail Pola WhatsApp Status), वॉलपेपर (Wallpaper), HD Images शेअर करून देखील व्यक्त करू शकता.
Happy Bail Pola 2020 Marathi Wishes: महाराष्ट्रात आज (18 ऑगस्ट) बैल पोळ्याचा (Bail Pola) सण आहे. कृषीप्रधान भारत देशामध्ये शेतकर्यांच्या साथीने वर्षभर राबणार्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात स्थानिक प्रथा- परंपरांनुसार पिठोरी अमावस्येच्या (Pithori Amavasya) दिवशी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. श्रावण महिना सरला की जवळपास शेतीची कामं संपतात. या दिवसाचं औचित्य साधत बळीराजा बैलाची पूजा करून त्याच्या मेहनतीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो. मग आज आपला अन्नदाता असणार्या शेतकर्याच्या साथीदाराप्रती तुमची कृतज्ञता सोशल मीडीयामध्ये मराठमोळे मेसेजेस, शुभेच्छा, बैल पोळ्याचे व्हॉट्सअॅप स्टेट्स (Bail Pola WhatsApp Status), वॉलपेपर (Wallpaper), HD Images शेअर करून देखील व्यक्त करू शकता. Bail Pola Wishes in Marathi: बैल पोळ्याच्या शुभेच्छा मराठमोळे मेसेजेस, Wishes च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून खास करा बळीराजाचा सण!
पिठोरी अमावस्येला बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना सजवून त्यांची पूजा करतो. घरात बैल नसतील तर त्यांच्या मूर्ती आणून पूजा केली जाते. तसेच बैलांना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी त्यांची पूजा करून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे.
बैल पोळा 2020 शुभेच्छा
महाराष्ट्रात सध्या कोरोना संकटामुळे सणावारांवरही त्याच संकट पहायला मिळत आहे. आज बैल पोळ्याचा सण देखील गावागावांत अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असल्याने तेथील शेतकरी कोरोना सोबतच पूराच्या संकटाचादेखील सामना करत आहे.