डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मिळाला होता मरणोत्तर 'भारत रत्न' पुरस्कार

आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. तसं आजच्या दिवसाला खास इतिहास आहे. हा दिवस विविध घटनांचा साक्षी आहे. यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या दिवशी म्हणजेच 31 मार्च 1990 मध्ये 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे, त्याचे संपुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Photo Credits: Wikimedia Commons)

आज आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. तसं आजच्या दिवसाला खास इतिहास आहे. हा दिवस विविध घटनांचा साक्षी आहे. यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Baba Saheb Ambedkar) यांना या दिवशी म्हणजेच 31 मार्च 1990 मध्ये 'भारत रत्न' (Bharat Ratna) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे, त्याचे संपुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.

बाबासाहेबांनी भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते. आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत बदल केला. (हेही वाचा - Ram Navami 2020 Messages: राम नवमी निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून वंदन करुया श्रीरामाला!)

डॉक्टर भिमराव आंबेडकरांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौरजवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. भिमराव आंबेडकर हे महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते. त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे. बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्याकरता मोठा संघर्ष करावा लागला.

भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले. तेथे त्यांना अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांना बडौदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना न्युयाॅर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्चपदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी 1913 ला ते अमेरिकेत निघून गेले.

भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जातीपातीच्या भेदभावा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा, सामना करावा लागला होता. डॉ.आंबेडकर 1955 या वर्षांमधे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार चिंतीत होते. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी , यांसारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. दिर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौध्द धर्म स्विकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणेच त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीमदर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now