APJ Abdul Kalam Birth Anniversary: भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहलेली ही '5' प्रेरणादायी पुस्तकं विद्यार्थ्यांना ठरू शकतात दिशादर्शक!

कलामांच्या या पुस्तकांच्या वाचनाने तुम्हांला अनेक निर्णय घेण्यासाठी उडालेला विचारांचा गोंधळ कमी करता येऊ शकतो.

Dr. APJ Abdul Kalam (Photo Credits: PTI

भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन (Vachan Prerna Din) म्हणून देखील साजरा केला जातो. त्यामुळे आज 15 ऑक्टोबर हा दिवस अब्दुल कलाम यांच्या जयंती सोबतच विद्यार्थी दिन आणि वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहेत. डो. एपीजे अब्दुल कलाम हे एक संयमी व्यक्तिमत्त्व, वैज्ञानिक, भारतरत्न पुरस्कार विजेते होते. भारताचा मिसाईल मॅन अशी ओळख असणार्‍या अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंग आले आहेत. पेपर विकणारा मुलगा ते भारताचे राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून भारताच्या भावी पिढीला अनेक प्रेरणादायी गोष्टी मिळू शकतात. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या लेखणीतून अनेक प्रेरणादायी पुस्तकं लिहली आहेत. तुम्हीदेखील भविष्याबद्दल, करियरबद्दल संभ्रमात असाल तर डॉ. कलामांच्या या पुस्तकांच्या वाचनाने तुम्हांला अनेक निर्णय घेण्यासाठी उडालेला विचारांचा गोंधळ कमी करता येऊ शकतो. World Students' Day 2020: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो जागतिक विद्यार्थी दिन; जाणून घ्या यंदाची थीम, इतिहास आणि महत्त्व.

विंग्ज ऑफ फायर

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र 'विंग्ज ऑफ फायर' या नावाने लिहलेले अअहे. त्याचा मराठी अनुवाद 'अग्निपंख' आहे. ऑनलाईन, ऑफलाईन आणि आता ऑडिओबुक्समध्येही पुस्तकं उपलब्ध असल्याने आता तुम्हांला अनेक प्लॅटफॉर्ममध्ये कलामाच्या आयुष्याचा वेध घेणारे हे पुस्तक उपलब्ध होऊ शकतं. नक्की वाचा:  डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे '5' प्रेरणादायी विचार बदलू शकतात तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’

इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’याचादेखील मराठीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे. भारत हा विकसित देश होऊ शकतो असा विश्वास डॉ. कलाम यांनी वर्तवला होता. या पुस्तकामध्ये अनेक थिअरीजच्या माध्यमातून तो पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

टर्निंग पॉइंट्स

डॉ. कलाम यांचे टर्निंग पॉइंट्स हे पुस्तक मराठी, इंग्रजी भाषेत याच नावाने प्रसिद्ध आहे. हे पुस्तक Wings of Fire चं सिक्वेल समजलं जातं. यामध्ये कलामांचा राष्ट्रपती भवनातील प्रवास आहे. त्यांच्यामते भारताने टेक्नॉलॉजी वापरून विकासावर भर द्यावा. e-governance चे ते पुरस्कर्ते होते.

इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया

इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया या डॉ. कलामांच्या इंग्रजी पुस्तकाचे मराठीमध्ये ’प्रज्वलित मने’या नावाने अनुवादित पुस्तकही उपलब्ध आहे. या पुस्तकामध्ये डो. कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे कथन केले आहे. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने भावी पिढीसाठी काही मोलाचे विचार, आयडियाज शेअर केलेल्या आहेत.

इनडॉमिनंट स्पिरिट

Indomitable Spirit या डॉ. कलामांच्या पुस्तकामध्ये पूर्व राष्ट्रपती ंनी मुल्यं, विचार आणि आदर्श मांडले आहेत. तसेच महिलांप्रती आदर राखण्याच्या त्यांच्या स्वभावाचा यामध्ये प्रत्यय येतो. महिला ही देवाने बनवलेली अत्यंत सुंदर गोष्ट आहे. रामेश्वराच्या तटापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास यामध्येही आहे.

भारतामध्ये अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व होऊन गेली आहेत. यापैकी एक डॉ. कलाम आहेत. आज त्यांच्या जयंती आणि वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने तुमची वाचनाची सवय मागे पडली असेल तर ती पुन्हा सुरू करा. या दिवसाच्या निमित्ताने तुम्हांला पुन्हा अनेक पुस्तकं चाळण्याची संधी मिळेल. शारिरीक विकासासाठी जसा आहार, व्यायाम गरजेचा असतो तसेच तुमच्या बौद्धिक वाढीसाठी, प्रगल्भतेसाठी चांगलं साहित्य ऐकायला, वाचयला आणि पहायला शिकणं देखील गरजेचे आहे.