Anti-Valentine Week 2022 List: स्लॅप डे पासून ब्रेक-अप डे पर्यंत, तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी साजरा करा Anti-Valentine Week

फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो हा महिना प्रेमात असलेला प्रत्येक व्यक्ती साजरा करतो आणि व्हॅलेंटाईन वीकची आतुरतेने वाट पाहत असतो.

प्रेमात असलेल्या प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा महिना म्हणजे फेब्रुवारी होय. फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो हा महिना प्रेमात असलेला प्रत्येक व्यक्ती साजरा करतो आणि व्हॅलेंटाईन वीकची आतुरतेने वाट पाहत असतो. परंतु असे ही काही लोक आहेत ज्यांना अँटी-व्हॅलेंटाईन आठवड्याची गरज असते, असे लोक आहेत ज्यांना प्रेमाच्या संकल्पना नकोश्या वाटतात. कदाचित नाते तुटल्यामुळे किंवा विश्वासाच्या अभावामुळे त्यांना या गोष्टी आवडत नाही. चॉकलेट्स, टेडीज आणि गुलाबांसाठीची संपूर्ण इच्छा त्यांची मरते म्हणूनच काही लोक 14 फेब्रुवारीनंतर येणारे दिवस एन्जॉय करतात. विशेष म्हणजे, अनेक लोक अँटी व्हॅलेंटाईन वीक मोठ्या उत्साहात एन्जॉय करतात. 15 फेब्रुवारीपासून अँटी-व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू होईल आणि पहिला दिवस स्लॅप डे असेल. ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे किंवा भूतकाळात तुमचा विश्वास तोडला आहे अशा लोकांना फटकारण्याची हा दिवस उत्तम संधी आहे. आणि जर स्लॅप काम करत नसेल तर तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी आमच्याकडे १६ फेब्रुवारीला किक डे आहे. यानंतर, 17 फेब्रुवारीला परफ्यूम डे आहे ज्याच्या सुंदर सुगंध सहवासात एखाद्या समजदार व्यक्तीप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढे मूव्ह ऑन करावे. 21 फेब्रुवारीला ब्रेक-अप डे सह अनरोमँटिक आठवड्याचा शेवट होईल.

Date Day Anti-Valentine Week Days
15 Feb मंगळवार स्लॅप डे
16 Feb बुधवार किक डे
17 Feb गुरुवार परफ्यूम डे
18 Feb शुक्रवार फ्लर्टिंग डे
19 Feb शनिवार कन्फेशन डे
20 Feb रविवार मिसिंग डे
21 Feb सोमवार ब्रेक-अप डे

 

लक्षात ठेवा, कोणताही आठवडा वाईट नाही. अँटी-व्हॅलेंटाईन सप्ताहाची संकल्पना जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे. नातेसंबंध आणि प्रेम या संकल्पनेचा तिरस्कार करणार्‍या प्रत्येकासाठी हा आठवडा आहे.