Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थी चा उपवास सोडण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजाविधी
रात्री चंद्रोदयानंतर आपला उपवास सोडतात. यासाठी तुम्हाला चंद्रोदयाची वेळ माहित आवश्यक आहे.
विद्येची देवता असलेला गणपती गणेशभक्तांचे आराध्य दैवत आहे. आपल्यावर आलेले संकट तो दूर करतो आणि कठीण प्रसंगी तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. याच गणेशाची मनोभावे पूजा करण्यासाठी आज म्हणजेच 2 मार्चला अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) आली आहे. वर्षात सहा महिन्याच्या अंतराने दोन अंगारकी चतुर्थी येतात. आजची अंगारकी ही या वर्षातील पहिली अंगारकी आहे. त्यामुळे भाविकांमध्येही प्रचंड उत्साह आहे. या दिवशी गणेशभक्त गणेशाची पूजा-अर्चा करून उपवास धरतात. रात्री चंद्रोदयानंतर आपला उपवास सोडतात. यासाठी तुम्हाला चंद्रोदयाची वेळ माहित आवश्यक आहे.
यंदा तीन अंगारकी चतुर्थी आहे. ज्यातील पहिली अंगारकी 2 मार्चला, त्यानंतर 27 जुलै आणि 23 नोव्हेंबरला असणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची (Lord Ganesha) आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते. दिवसभराचा उपवास करून गणपतीची आराधना करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. चला तर मग, यंदाच्या अंगारकी निमित्त या दिवसाचे महत्व, पूजाविधी आणि तिथी जाणून घेऊयात..हेदेखील वाचा- Angarki Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीदिवशी मुंबईमधील सिद्धिविनायकाचे ऑफलाईन दर्शन बंद; ऑनलाईन दर्शनाची सोय
अंगारकी चतुर्थी 2021 तारीख : मंगळवार, 2 मार्च 2021
चतुर्थी तिथी प्रारंभ: 2 मार्च 2021 , सकाळी 5 वाजून 46 मिनिटे
चतुर्थी तिथी समाप्ती: 3 मार्च 2021 , रात्री 2 वाजून 59 मिनिटे
चंद्रोदय: 2 मार्च, रात्री 9 वाजून 41 मिनिटे
अंगारकी पूजा विधी
यादिवशी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ उरकून स्वच्छ नवे कपडे परिधान करावे. श्रीगणेशाची प्रतिमा घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापन करून पूजेचा संकल्प घ्यावा. अनुक्रमे या प्रतिमेला पाणी, अक्षदा, दुर्वा,पान, फुलं, धूप इत्यादी अर्पण करावे. नैवैद्याला मोदक किंवा अन्य गोडाचे पदार्थ ठेवावे. पूजेच्या वेळेस म्हणजे चंद्रोदयानंतर गणपतीची आरती करून भोजन करावे. शक्यतो या जेवणात लसूण व कांद्याचा समावेश करणे टाळावे.