Amla Navami 2020: 'अक्षय नवमी' कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
Amla Navami 2020: अक्षय नवमी (Akshaya Navami) म्हणजे आवळा नवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अक्षय नवमीच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. अक्षय नवमी ही देव उठनी एकादशीच्या दोन दिवस आधी साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार, सतयुगाची सुरुवात अक्षय नवमीच्या दिवसापासून झाली. त्यामुळे या दिवसाला सत्य युग असेही म्हणतात. हा दिवस अक्षय तृतीयेसारखाचं आहे. असे म्हणतात की, त्रेता युगाची सुरुवातही याच दिवशी झाली होती आणि त्याला त्रेता युग म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस कोणत्याही प्रकारचे दान करण्यास अनुकूल आणि शुभ मानला जातो.
यावर्षी अक्षय नवमी 23 नोव्हेंबरला आहे. देशातील विविध भागात अक्षय नवमीला 'आवळा नवमी' असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, आवळ्याच्या झाडावर अनेक देवता राहतात. त्यामुळे अनेक भक्त आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. पश्चिम बंगालमध्ये अक्षय नवमीचा दिवस जगधात्री पूजा म्हणून साजरा केला जातो. तेथील लोक या दिवशी जगधात्री देवीची पूजा करतात. असं म्हटलं जात की, या दिवशी मथुरा-वृंदावनाची परिक्रमा करणाऱ्या भक्तांना आनंद आणि समृद्धी मिळते. (हेही वाचा - Chhath Puja 2020 Messages: छठ पूजेच्या मंगलमयी शुभेच्छा, Wishes, Quotes द्वारे देऊन सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवून आनंदात साजरा करा हा सण!)
अक्षय नवमीचे महत्त्व -
अक्षय नवमीच्या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. या दिवशी स्नान, पूजन आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्ती होते. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील परंपरा आहे. देशातील विविध राज्यात आवळा नवमीचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आवळा नवमीचे व्रत केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच मोक्ष प्राप्तीदेखील होते. या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. अक्षय नवमीला कुष्मंद नवमी म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णूने या दिवशी कुष्मंद राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
टीप: या लेखातील कोणतीही माहिती / सामग्री / अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी देत नाही. ही माहिती आपल्याला विविध माध्यमांद्वारे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / शास्त्रवचनांकडून संकलित करुन दिली गेली आहे. आमचा हेतू फक्त ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे हा आहे. वाचकाने यास केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावे.