Ambedkar Jayanti 2021 Wishes: भीम जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मराठमोळी Greetings, WhatsApp Status, Messages!
त्याचं औचित्य साधत शेअर करा मराठमोळी शुभेच्छापत्रं!
Bhim Jayanti Wishes In Marathi: हरिजन, दलितांना समाजात स्थान मिळवून देणारे नेते, कायदे पंडीत आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरी केली जाते. डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Bhimrao Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू या गावामध्ये झाला. भीमरावांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परदेशात जाऊन कायद्याची पदवी मिळवली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी दलित, अस्पृश्य जाती, जमातील लोकांना शिक्षणाची कवाडं खुली करत मुख्य प्रवाहामध्ये आणलं. भीम अनुयायींकडून म्हणूनच या महामानवाला अभिवादन म्हणून दरवर्षी भीम जयंती साजरी केली जाते. यंदा कोरोना संकटामुळे सार्यांनीच घरामध्ये राहून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मग यंदा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना या भीम जयंतीला चैत्यभूमीवर भेटता येणार नसल्याने सोशल मीडियात व्हॉट्सअॅप, फेसबूक द्वारा मेसेज करून शुभेच्छा द्यायला विसरू नका.
दरवर्षी भीम अनुयायी आंबेडकर जयंतीला एकत्र जमून शिवाजी पार्क परिसरात असलेल्या चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतीला वंदन करतात. पण यंदा चैत्यभूमीचं दर्शन ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. मग डिजिटल स्वरूपात साजरी होणारी यंदाची भीम जयंती सुरक्षित वातावरणामध्ये साजरी करण्यासाठी ती घरात राहूनच साजरी करा. Dr.BR Ambedkar Jayanti 2021 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन साजरा करा भीम जयंतीचा उत्सव!
भीम जयंतीच्या शुभेच्छा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना भीम जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या आम्हांला माणुसकीची
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या भीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला!
भीम जयंती दिवशी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पवित्र स्मृतिस कोटी कोटी प्रणाम!
आता महाराष्ट्रामध्ये भीम जयंतीचा हा दिवस म्हणजे 14 एप्रिल ‘ज्ञान दिन’ म्हणून देखील साजरा केला जातो. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये या 'ज्ञान दिवस सेलिब्रेशन'ची सुरूवात झाली. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे. परंतू यंदा अवघं जग कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना हे सेलिब्रेशन यंदा पुन्हा सामुहिकरित्या एकत्र येऊन न करता वैयक्तिक पातळीवर करण्याची गरज आहे.