Akshaya Tritiya Messages 2024 Messages In Marathi: अक्षय्य तृतीया दिवशी Wishes, Quotes, Greetings शेअर करत साजरा करा मंगलमय दिवस आज!
अक्षय्य तृतीयेला दानाचं महत्त्व असल्याने आजच्या दिवशी तूप, साखर, तृणधान्ये, फळे, भाजीपाला, चिंच, वस्त्र, सोने, चांदी, पाण्याचे मडके आणि इतर वस्तूंचे दान केले जाते.
वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस हा अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) म्हणून साजरा केला जातो. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यंदा 10 मे दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय म्हणजे ‘जे कधीही संपत नाही’, म्हणूनच असे म्हटले जाते की, अक्षय्य तृतीयेला केलेल्या कार्माचेही कधी न संपणारे फळ मिळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. म्हणून ही तिथी अक्षय्य मानली गेली आहे. मग असा या शुभ दिनी तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देत हा दिवस साजरा करण्यासाठी खालील ग्रिटींग्स डाऊनलोड करून तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram द्वारा शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा देत प्रियजनांच्या दिवसाची सुरूवात देखील खास करू शकता.
यज्ञ, होम हवन, जप तप, दान, पुण्य असे कुठलेही कर्म आपणास अक्षय फळप्राप्ती देणारे आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशीच महर्षी व्यास यांनी महाभारत लिहायला सुरूवात केली असेही सांगितले जाते. याच दिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली अशी देखील एक मान्यता आहे. त्यामुळे अनेक दृष्टीने हिंदू बांधवांसाठी आजचा हा अक्षय्य तृतीयेचा दिवस खास आहे. Akshaya Tritiya 2024 Wishes in Marathi: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा सणाचा आनंद .
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेला दानाचं महत्त्व असल्याने आजच्या दिवशी तूप, साखर, तृणधान्ये, फळे, भाजीपाला, चिंच, वस्त्र, सोने, चांदी, पाण्याचे मडके आणि इतर वस्तूंचे दान केले जाते. त्यामुळे आजच्या सणाला सेलिब्रेशन सोबतच दानाचं महत्त्वही ध्यानी ठेवत हा दिवस साजरा करायला विसरू नका.