Akshaya Tritiya 2024 Wishes in Marathi: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत द्विगुणित करा सणाचा आनंद

कृषी प्रधान भारतात या दिवशी बळीराजा कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतो.

Akshaya Tritiya | File Image

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. यंदा 10 मे दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हिंदूंप्रमाणेच जैन बांधव देखील हा सण विशेष साजरा करतात. अक्षय्य तृतीयेला दान करण्याची प्रथा आहे. या सणाच्या निमित्ताने केले जाणारं दान अक्षय म्हणजे त्याचा कधीच क्षय होत नाही अशा स्वरूपात राहते अशी हिंदू बांधवांची धारणा आहे त्यामुळे या दिवसचं विशेष महत्त्व आहे. मग अशा या मंगल दिवशी तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना, परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings द्वारा शुभेच्छापत्र शेअर करत या दिवसाचा आनंद तुम्ही नक्कीच द्विगुणित करू शकाल.

अक्षय्य तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार, घर, वाहन, सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी असते. वैशाखात उन्हं प्रखर झालेली असतात त्यामुळे पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी वाटसरूंसाठी थंड पाण्याचे माठ ठेवले जातात. तसेच सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करण्याची देखील या दिवसाची रीत आहे. यामुळे पितर संतुष्ट होतात अशी धारणा आहे. नक्की वाचा: Akshaya Tritiya 2024 Rangoli Designs: अक्षय तृतीयेला घराच्या अंगणात काढा 'या' सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स; Watch Video .

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya | File Image
Akshaya Tritiya | File Image
Akshaya Tritiya | File Image
Akshaya Tritiya | File Image
Akshaya Tritiya | File Image

हिंदू पुराण कथांनुसार, अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. कृषी प्रधान भारतात या दिवशी बळीराजा कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतो. तर महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात जी चैत्रगौरीची पूजा करून घरात स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्याची सांगता देखील या अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने केली जाते.