Akshaya Tritiya 2024 HD Images: अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी खास Messages, Wishes, WhatsApp Status शेअर करत द्या शुभेच्छा
या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेला सोने, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणे फार शुभ ठरते.
Akshaya Tritiya 2024 Images in Marathi: साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2024) दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या दिवशी केलेले दान फलदायी मानले जाते, म्हणून या दिवशी दान-पुण्य करण्याची विशेष प्रथा आहे. अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवारी, 10 मे रोजी पहाटे 4.17 वाजता सुरू होईल. ही तिथी शनिवारी, 11 मे रोजी मध्यरात्री 2.50 पर्यंत राहील. म्हणजेच उदय तिथीनुसार, या वर्षी अक्षय्य तृतीया 10 मे रोजी आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करण्यास कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेला सोने, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणे फार शुभ ठरते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून, ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून सूर्य देवाची पूजा केल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
तर अशा या शुभदिनी खास Images, Messages, Greetings, Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा.
अक्षय तृतीया शुभेच्छा
(हेही वाचा: Akshaya Tritiya 2024 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)
दरम्यान, अक्षय तृतीयेशी अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत. याच दिवशी भगवान विष्णूचे सहावे अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म झाल्याचे समजले जाते. यासह महर्षी वेद व्यास यांचाही जन्म अक्षय तृतीयेला झाला असे म्हटले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेतला असे मानतात. अक्षय तृतीयेला गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असेही मानले जाते आणि महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली अशीही मान्यता आहे.