Akshaya Tritiya 2020: अक्षय तृतीये निमित्त दान करण्यासाठी '5' ऑनलाईन पर्याय!
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपल्या मदतीची गरज आहे.
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात ज्या तृतीयेला चंद्र रोहिणी नक्षत्रात येतो त्या तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' साजरी केली जाते. हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असून या दिवशी आपण जे काही कार्य करतो ते अक्षय फळ देणारं ठरतं म्हणूनच या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. आपल्यातील थोडेसे गरजू गरिबांना दिल्याने त्यांचे आयुष्य आनंदी होतेच पण त्याचबरोबर आपल्यालाही दिल्याचे समाधान लाभते. अन्न, जलदान श्रेष्ठ आहेच पण त्याचबरोबर ज्ञानदान, पुस्तकदान, श्रमदान, वस्त्रदान देखील तितकेच पुण्यकारक आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगात अक्षय्य तृतीये निमित्त केलेला नेत्रदान, अवयवदान, देहदानाचा संकल्प सर्वश्रेष्ठ ठरेल. (अक्षय्य तृतीये निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून साजरा करा हा शुभ दिवस!)
सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत बाहेर जावून दान करणे शक्य होणार नाही. मात्र आपण ऑनलाईन माध्यमातून अनेकांपर्यंत मदत पोहचवू शकतो. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यामुळे काही अधिकृत साईट्स त्याद्वारे तुम्ही ऑनलाईन डोनेशन करु शकता.
CM Relief Fund:
CM Relief Fund मध्येही तुम्ही दान करुन कोरोना विरुद्धच्या लढ्यात तुमचे योगदान देऊ शकता.
https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/DonationOnlineForm.action
WHO Donation:
जागतिक आरोग्य संघटनेला दान करुन जागतिक आरोग्य संकटात मदत करु शकता.
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/donate
PM Care:
PM Cares ला मदत करुन तुम्ही कोरोना विरुद्धच्या संकटात सहभागी होऊ शकता.
https://www.pmcares.gov.in/en/web/contribution/donate_india
Donate Food:
अक्षया पत्र येथे दान करुन गरजू गरीब मुलांपर्यंत अन्न पोहचवू शकता.
Donate Clothes:
SADS India येथे तुम्ही कपडे दान करु शकता.
यांसारख्या अशा अनेक साईट्स आहेत तिथे तुम्ही दानधर्माचा आनंद घेऊ शकता. मात्र कोणतेही दान करण्यापूर्वी साईट्सची सत्यता तपासणे आवश्यक आहे.
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या कठीण काळात रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. लॉकडाऊनच्या हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन सरकारकडून वारंवर केले जात आहे. तसंच कोरोनाचा संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांचे रक्त कोरोना विरोधात लढण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून रिकव्हर झालेल्या कोरोना बाधितांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशावेळी अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत रक्तदान करा आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा.