Akshaya Tritiya 2020 निमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करताय? हे आहेत '5' ऑनलाईन पर्याय

त्यामुळे सराफांच्या दुकानात जावून सोनं खरेदीचा आनंद घेता येणार नाही. परंतु, ऑानलाईन माध्यमातून सोनं खरेदी करण्याचा पर्याय खुला आहे. दरम्यान ऑनलाईन सोनं खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी पडताळून पाहणे गरजेचे आहे.

Gold | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

आज अक्षय्य तृतीयेचा शुभ सण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र कोरोना व्हायरस दहशतीमुळे देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे सराफांच्या दुकानात जावून सोनं खरेदीचा आनंद घेता येणार नाही. परंतु, ऑानलाईन माध्यमातून सोनं खरेदी करण्याचा पर्याय खुला आहे. तसंच काही ज्वेलर्सनी आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय खुला केला आहे. सेनको गोल्ड यांनी देखील ग्राहकांसाठी ऑनलाईन ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर 22-27 एप्रिल दरम्यान सुरु राहणार आहे. या ऑफर अंतर्गत त्या दिवशी असलेल्या सोन्याच्या दरानुसार तुम्हाला सोने खरेदी करता येईल. (Gold Rate Today: अक्षय्य तृतीये दिवशी मुंबई, पुणे यांसह महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर?)

PNB ज्वेलर्सने देखील अक्षय्य तृतीय निमित्त ऑनलाईन सोने खरेदीची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. 'वेधनी ई-व्हाऊचर ऑफर' आणि 'प्युअर प्राईज ऑफर' अशा दोन ऑफर्स देण्यात आल्या आहेत. वेधनी ई-व्हाऊचर द्वारे ग्राहक अक्षय्य तृतीयेला सोन्याचे बुकींग करु शकतात आणि लॉकडाऊन संपल्यानंतर ते सोने तुम्ही घरी आणू शकता. प्युअर प्राईज ऑफर अंतर्गत ग्राहकांना मिळणाऱ्या लाभाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. कारण खरेदी करता सोन्याच्या दराप्रमाणे सोनं बुक करु शकता. मात्र लॉकडाऊन नंतर सोन्याचे भाव उतरल्यास तुम्हांला त्या दरानुसार सोने घरी घेऊन जावे लागेल. दरम्यान ऑनलाईन सोनं खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी पडताळून पाहणे गरजेचे आहे. जाणून घेऊया ऑनलाईन सोने खरेदीची काही पर्याय: (अक्षय्य तृतीया च्या खास मराठमोळ्या शुभेच्छा, Messages,Greetings, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन करा दिवसाची मंगलमयी सुरुवात)

डिजिटल गोल्ड

डिजिटल गोल्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करता येते. तसंच हे सोने तुम्ही सुरक्षितरित्या स्टोअर करु शकता.

एक्‍सचेंज ट्रेडेड-फंड ETF

हा सोने खरेदी करण्याचा अगदी सोपा पर्याय आहे. यात सोने पेपर फॉर्मेट द्वारे खरेदी करु शकता किंवा विकू शकता.

सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड SGB

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड हा देखील एक पर्याय आहे. हा बॉन्ड सरकारकडून जारी करण्यात येतो. सोन्यातील दीर्घ कालीन गुंतवणूकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. काही महिन्यांच्या अंतराने ही स्किम सादर करण्यात येते. या बॉन्डसाठी टॅक्स देखील भरावा लागत नाही.

फिजिकल गोल्ड

या पर्यायात सोन्याचे दागिने किंवा कॉईन, वळं असं खरेदी करता येईल. मात्र तज्ञांच्या सल्लानुसार, फिजिकल गोल्ड मध्ये गुंतवणूक करणे तितकेसे फायदेशीर ठरत नाही.

गोल्ड बिस्किट

सोने ज्वेलरी, कॉईन किंवा बिस्किट स्वरुपातही खरेदी करता येईल. मात्र यात सुरक्षिततेची चिंता असते.

ऑनलाईन सोने खरेदी हा एक उत्तम पर्याय ग्राहकांसाठी खुला आहे. मात्र त्याद्वारे आपली फसवणूक किंवा तोटा होणार नाही याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.