Valentine Week 2023 Full List: व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी; Rose Day पासून Valentine's Day पर्यंतच्या दिवसांच वेळापत्रक घ्या जाणून

पण कोणत्या दिवशी कोणता उत्सव साजरा केला जातो याबद्दल जर तुमचा थोडासा संभ्रम असेल तर येथे तुम्ही कॅलेंडर पाहू शकता.

Valentine Week 2023 (PC - File Image)

Valentine Week 2023 Full List: प्रेमात पडलेल्यांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास आहे. कारण हा महिना विशेषत: प्रेम आणि रोमान्ससाठी ओळखला जातो. या महिन्यात, व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. परंतु 7 फेब्रुवारीपासूनच व्हॅलेंटाईल वीकला सुरुवात होते. ज्याला व्हॅलेंटाईन वीक किंवा लव्ह वीक असेही म्हणतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोज डेने होते. पण कोणत्या दिवशी कोणता उत्सव साजरा केला जातो याबद्दल जर तुमचा थोडासा संभ्रम असेल तर येथे तुम्ही कॅलेंडर पाहू शकता. ज्यानुसार, तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाचे उत्तम नियोजन करू शकता.

Rose Day : 7 फेब्रुवारी (रविवार)

व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाबाचं फुल देऊन प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकता. वेगवेगळ्या रंगाचे गुलाब वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून ज्याला गुलाब देणार आहात त्याला विचारपूर्वक द्या.

प्रपोज डे: 8 फेब्रुवारी (सोमवार)

रोज डे नंतरचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला तुमचे प्रेम धैर्याने व्यक्त करू शकता.

चॉकलेट डे: फेब्रुवारी 9 (मंगळवार)

व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडीदाराला आपल्या आवडीचे चॉकलेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी, प्रेमळ जोडपे एकमेकांना चॉकलेट गुच्छे, चॉकलेट बास्केट विशिष्ट प्रकारे भेट देतात.

टेडी डे: 10 फेब्रुवारी (बुधवार)

टेडी डे म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस. जेव्हा लोक आपल्या जोडीदाराला टेडी बेअर देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

प्रॉमिस डे : 11 फेब्रुवारी (गुरुवार)

प्रेमळ जोडपे व्हॅलेंटाईन वीकचा 5 वा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी ते आयुष्यभर प्रेम करण्याचे आणि एकत्र राहण्याचे वचन देतात. तसे, तुम्ही हा दिवस केवळ तुमच्या जोडीदारासोबतच नाही तर तुमच्या हृदयाच्या जवळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत साजरा करू शकता, मग ती तुमची आई, बहीण किंवा मित्र असो.

हग डे : 12 फेब्रुवारी (शुक्रवार)

व्हॅलेंटाईन वीकच्या 6 व्या दिवशी हग डे साजरा केला जातो. लोक एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.

किस डे: 13 फेब्रुवारी (शनिवार)

व्हॅलेंटाईन वीकचा 7 वा दिवस किस डे म्हणून 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन डे: 14 फेब्रुवारी (रविवार)

व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण सहलीचे प्लॅन बनवतात, कोणी डिनर डेटसाठी जातात. त्यामुळे हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ आहे.