Transgender Fashion Show in Akola: टान्सजेंडर्स जेव्हा 'रॅम्प वॉक' करतात, अकोला येथे तृतीयपंथींचा 'फॅशन आणि टॅलेंट शो'
भारतात समारंभांची कमी नाही. पण, अकोल्यात पार पडलेला हा खास कार्यक्रम खूपच वेगळा होता.
अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट (Akot) येथे नुकत्याच पार पडलेल्या एका 'फॅशन आणि टॅलेंट' शोमुळे (Transgender Fashion Show) केवळ जिल्हाच नव्हे तर अवघ्या राज्याचे लक्ष्य वेधून घेतले. भारतात समारंभांची कमी नाही. पण, अकोल्यात पार पडलेला हा खास कार्यक्रम खूपच वेगळा होता. अकोल्यात चक्क चक्क तृतीय पंथीय (Third Gender) यांचा फॅशन आणि टॅलेंट शो (Akola Transgender Fashion Show) मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे राज्य आणि काही प्रमाणात राज्याबाहेरीलही ट्रान्सजेंडर्सनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. ट्रान्सजेंडरचे मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमात सहभागी होणे बरेच काही सांगून जात होते.
एकट्या अकोला जिल्ह्यातून फॅशन व टॅलेंट शोमध्ये जवळपास 33 तृतीयपंथी सहभागी झाले. तर अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथींनी हजेरी लावली होती. यात विदर्भातील तृतीयपंथीचा अधिक समावेश होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी अकोटकरांना मंत्र मुग्ध केले. त्यांनी आपल्यातील विविध कलांचे सादरीकरण मोठ्या सक्षमपणे या ठिकाणी केले. तृतीयपंथी बद्दल समाज्याच्या मनात असलेली भावना बदलली जावी. त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजन करणयात आले होते. यात रॅम्प वॉकचाही समावेश होता.
व्यक्ती विकास संघटन अशी ओळख असलेलेल्या जेसीआय अकोटच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजात नेहमीच दुर्लक्षीत घटक राहिलेल्या तृथीयपंथीयाबद्दल समाजाच्या मनात आदर निर्माण व्हावा या हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला मोठा प्रसिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
पठिमागील 42 वर्षांपासून जेसीआय ही संस्था अकोट येथे विशेष सप्ताहाचे आयोजन करते. हा सप्ताह संपूर्ण भारतामध्ये 9 ते 15 सप्टेंबर या कालावधीत पार पडतो, अशी माहिती जेसीआयचे अध्यक्ष अतुल भिरडे देतात. या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जातात. जसे की, बफेलो ब्युटी काँटेन्स, बैलांचा फॅशन शो, डॉग शो, बुलेट राजा कॉम्पिटिशन, घोड्यांचा फॅशन शो वगैरे. प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा तृतीयपंथींसाठी हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.