Navratri 2020 5th Day Saree Colour: सई ताम्हणकर, सोनाली कुळकर्णी ते सायली संजीव यांच्या निळ्या साड्या, ड्रेस मधील लूक पाहून सज्ज व्हा नवरात्रीमधील पंचमीच्या सणाला!

इलेक्ट्रिक ब्लू रंग, आभाळाचा निळाशार रंग हे सामान्यपणे अनेकांच्या ठेवणीत असतात. निळा रंग शांतता, स्थैर्य, आत्मियता, विश्वास याचे संकेत देणारा रंग आहे.

Navratri Day 5 Blue Colour | Photo Credits: Instagram

Navratri 2020 5th Day Blue Colour:   महाराष्ट्रासह देशभरात शनिवार, 17 ऑक्टोबर पासून नवरात्र 2020 ला सुरूवात झाली आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीचा (Sharadiya Navratri) आज (21 ऑक्टोबर) पाचवा दिवस आहे. यंदा नवरात्रीवर कोरोनाचं संकट असलं तरीही नवरात्रीच्या नऊ रंगांद्वारे हा सण सुरक्षेची खबरदारी घेत साजरा केला जात आहे. दरम्यान भारतामध्ये विविध प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीनुसार हा सण साजरा होत आहे. नवरात्रीमधील आज पाचव्या दिवशी निळा रंग आहे. त्यामुळे किमान मास्क ते कपड्यांच्या रंगांमध्ये निळा रंग (Blue Colour)  वापरला जाणार आहे. तुम्ही देखील आज निळ्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल तर सेलिब्रिटींच्या काही वॉर्डरोब आयडीजमधून तुम्हांला मिक्स अ‍ॅन्ड मॅचसाठी काही आयडियाज मिळत आहे का बघा!

निळा रंग हा वेगवेगळ्या शेड्समध्ये उपलब्ध असल्याने तो प्रत्येकावर कोणत्या टोनमध्ये उठून दिसेल हे तुम्हांला ठरवायचं आहे. इलेक्ट्रिक ब्लू रंग, आभाळाचा निळाशार रंग हे सामान्यपणे अनेकांच्या ठेवणीत असतात. निळा रंग शांतता, स्थैर्य, आत्मियता, विश्वास याचे संकेत देणारा रंग आहे.

निळाशार रंगातील काही साडी आयडीयाज

सई ताम्हणकर

 

View this post on Instagram

 

मराठमोळी ! #saitamhankar

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

गिरीजा गोडबोले

 

View this post on Instagram

 

Day 3 #firodiakarandak Feeling (not so) Blue 💙 Styling and outfit @gawaksh_lifestyle Jewellery by @aadyaaoriginals #dayshigtnightshift #havebeenupsince24hours #almostbonkers

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole) on

सोनाली कुळकर्णी

 

View this post on Instagram

 

It’s this saree that brings the smile 😊 nice na.. . . Saree by @admyrin Styled by @prachethestylist 😘 . . #ootd #potd #saree #indian #ethnic #desistyle #sareenotsorry #sareelove #stylepost #bluesaree

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul) on

सायली संजीव

 

View this post on Instagram

 

Thank you so much for this lovely lovely dress 👗 @shopping_factory11 ❤️ • • • #shoppingonline #lovingit #style #slay #shoppingfactory11 #stayhome #staysafe

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

दरम्यान नवरात्रीमधील पंचमीचा दिवस हा ललिता पंचमीचा असतो. या दिवशी उपांग ललिता व्रत करण्याची पद्धत आहे. प्रामुख्याने महिला हे व्रत वंशवृद्धीसाठी करतात. या निमित्ताने हळदी कुंकवाचे कार्यक्रम, देवीची ओटी भरणं असे विधी केले जातात.

यंदा नवरात्रीमध्ये 17 ऑक्टोबरला राखाडी, 18 ऑक्टोबरला नारंगी, 19ऑक्टोबरला पांढरा, 20 ऑक्टोबरला लाल, 21ऑक्टोबरला निळा, 22ऑक्टोबरला पिवळा, 23ऑक्टोबरला हिरवा, 24ऑक्टोबरला मोरपिसी, 25ऑक्टोबरला जांभळा रंग आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now