Miss India 2022 : सिनी शेट्टीने पटकावला 'मिस इंडिया 2022'चा बहुमान, कर्नाटकाच्या शिरपेचात मानाचा तुरा
तर राजस्थानची रुबल शेखावतने फेमिना मिस इंडिया 2022 फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान द्वितीय उपविजेती ठरली.
VLCC फेमिना मिस इंडियाचा ग्रँड फिनाले मुंबईतील (Mumbai) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convection Center) पार पडला. यात मिस इंडिया वर्ल्ड (Miss India) 2022 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. कर्नाटकातील (Karnataka) सिनी शेट्टीने (Sini Shetty) फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 चा बहुमान पटकावला. तर राजस्थानची (Rajasthan) रुबल शेखावतने (Rubal Shekhawat) फेमिना मिस इंडिया 2022 फर्स्ट रनर अप आणि उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान (Shinata Chuhan) द्वितीय उपविजेती ठरली.
अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia), दिनो मोरिया (Dino Mariya), मलायका अरोरा (Maliaka Arora), डिझायनर रोहित गांधी (Rohit Gandhi), राहुल खन्ना (Rahul Khanna), कोरिओग्राफर श्यामक दावर आणि माजी क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) हे फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 चे पंच होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मुलींनी या स्पर्धेसाठी ऑडिशन्स दिली होती. त्यातून अंतिम फेरीसाठी 31 फायनलिस्टवर निवडण्यात आलेत. या अंतिम 31 स्पर्धकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आणि 3 जुलैला फेमिना मिस इंडियाचा ग्रँड फिनाले मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला.
मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये नेहा धूपिया, कृति सेनन (Kriti Senon), मलाइका अरोरा, राजकुमार राव (Rajkumar Rao), डिनो मोरेया, यांची विशेष उपस्थित होती. तर या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनिष पालने केले. ग्रँड फिनालेमध्ये कृति सेनननं विशेष परफॉर्मेंन्सनं देत सगळ्यांचं लक्ष वेधलं.मिस इंडिया 2022 सिनी शेट्टी मुळची कर्नाटकाची असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. सिनीचं वय फक्त 21 वर्ष असुन ती सध्या ती चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्टचा (Chartered Financial Analyst) कोर्स करत आहे. तसेच वयाच्या चौथ्या वर्षापासून ती भरतनाट्यम शिकते.