Diwali 2020 Special Mask With LED Lights: दिवाळी निमित्त बॅटरीवर चालणारे स्पेशल LED मास्क बाजारात उपलब्ध (Watch Video)

आता यापुढील 4-5 दिवस अगदी आनंदाचे आणि उत्साहाचे असतील. यंदा कोरोना व्हायरसचे संकट असले तरी सणाचा उत्साह काही कमी झालेला नाही. या संकटाला दोन हात करण्यासाठी काही खास गोष्ट केल्या जात आहेत.

Diwali Special Mask With LED Lights (Photo Credits: Youtube)

दिवाळीला सुरुवात झाली आहे. आता यापुढील 4-5 दिवस अगदी आनंदाचे आणि उत्साहाचे असतील. यंदा कोरोना व्हायरसचे संकट असले तरी सणाचा उत्साह काही कमी झालेला नाही. या संकटाला दोन हात करण्यासाठी काही खास गोष्ट केल्या जात आहेत. यंदा दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे एलईडी मास्क (LED Mask) उपलब्ध आहेत. बॅटरीवर चालणारे हे ईएल वायर पर्ज मास्क अगदी हलके आणि पोर्टेबल असतात. यामुळे तुम्ही दिवाळी निमित्त होणाऱ्या पार्टीज, फेस्ट, इव्हेंट्स, गेट टू गेदर इत्यादी कार्यक्रमांसाठी वापरु शकता. विशेष म्हणजे हे मास्क विविध कॅटेगरी आणि 7 रंगात उपलब्ध आहेत. 7 रंगाच्या LED लाईट मास्क मधून विविध रंगाच्या लाईट्स पेटतात. हा मास्क ऑपरेट करण्यासाठी बाजूला एक लहानसे बटण देण्यात आले आहे.

या मास्कची एलईडी लाईट्स ऑन केल्यानंतर ती वेगवेगळ्या रंगात पेटते. यंदाची दिवाळी कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली साजरी होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळासाठी हे विशेष मास्क तयार करण्यात आले आहे. या मास्कमध्ये लाईट असल्याने हा मास्क घालून तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठराल. (Diwali 2020: कोविड-19 संकटात 'इम्यूनिटी बूस्टर मिठाई' चा नवा ट्रेंड; दिवाळी निमित्त वाढती मागणी)

पहा व्हिडिओ:

हा मास्क तुम्ही तुमच्या पोशाखाला मॅक करु शकता. रंगीबेरंगी एलईडी मास्क दिवाळी सेलिब्रेशनमध्ये रंगत आणेल यात वाद नाही. दरम्यान, यंदा कोरोनाचे संकट असल्याने दिवाळी साध्या पद्धतीने पण अगदी दणक्यात साजरी करा. कोविड-19 चे संकट आणि दिवाळी सेलिब्रेशन यामुळे यंदा इम्युनिटी ब्युस्टर मिठाई देखील बाजारात उपलब्ध आहे.

यातूनच संकटातून मार्ग काढत सकारात्मकतेकडे वाटचाल करण्याचा मानवी स्वभाव प्रतीत होतो. दिवाळी हा दिव्यांचा सण. अंधार चिरुन प्रकाशाकडे नेणारा सण. यंदाच्या दिवाळी गेल्या वर्षभरात मनाला आलेले मरगळ दूर होऊन चैतन्य निर्माण होऊ, हीच पार्थना.