सूर्यास्तानंतर महिलांनी अजिबात करू नये 'या' चुका; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
असे केल्यास घरात दुर्देव आणि दारिद्र येते, असेही मानले जाते.
महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता की, ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होत नाही अशा घराचा नाश कोणीही रोखू शकत नाही. पुराणातसुद्धा महिलेचे वर्णन घराची लक्ष्मी म्हणून करण्यात आला आहे. यामुळे घरात सुख आणि शांती मिळवण्यासाठी गृहणी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. परंतु, काही महिलांकडून कळत-नकळत अशा काही चुका होतात की, ज्यामुळे घराच्या सुख-शांतीवर मोठा परिणाम होतो. यामुळे अशा चुका टाळणे गरजेचे आहे. मात्र, या चुका नेमक्या कोणत्या आहेत? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
1) रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही स्त्रिया खरकाटी भांडी स्वयंपाकघरात तशीच ठेवतात. यामुळे घरातील लक्ष्मी रागावून घरातून निघून जाते. ज्या घरात आपण रात्रीच्या वेळी भांडी घासून ठेवतात, त्या घरात आनंद, वैभव आणि शांती असते. घरात रात्री जेवल्यानंतर स्वयंपाकघरात खरकाटी भांडी ठेवल्याने घरातील यशात अडथळा येतात. एवढेच नव्हेतर, घरात पैसे येण्याचा मार्गात अडचणी येतात. तसेच रोगांचाही प्रसार होतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जातात. यामुळे स्त्रियांनी रात्री जेवणानंतर भांडी धुवून ठेवावी. हे देखील वाचा- Mokshada Ekadashi 2020: 'मोक्षदा एकादशी'चं व्रत केल्याने होते मोक्ष प्राप्ती; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
2) कधीकधी रात्रीच्या वेळी केसांना तेल लावल्यानंतर काही स्त्रिया केस बांधण्याऐवजी मोकळे ठेवून झोपतात. काही स्त्रिया केस मोकळे ठेवून झोपण्याची सवय असते. तर, काही स्त्रिया फॅशनच्या प्रभावाखाली असे करतात. हे सदोष मानले जाते. परंतु, केस मोकळे ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. तसेच घर आणि कुटुंब यांच्यात अशांततेचे आणि मतभेदांचे वातावरण तयार करते, अशा घरात लक्ष्मी थांबत नाही. म्हणून, स्त्रियांनी झोपेच्या आधी केस बांधून झोपले पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
3) घर स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूमध्ये लक्ष्मी वास करतात, असे हिंदू धर्मात मानले जाते. यामुळे घरात साफसफाई केल्यानंतर झाडू दक्षिण दिशेने ठेवला पाहिजे. तसेच झाडूला फेकू किंवा पायाने स्पर्श करू नये. याशिवाय सूर्यास्तानंतर घरात झाडूही मारू नये. झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो, असेही मानले जाते.
4) हिंदू शास्त्रानुसार तुळशीच्या झाडाला सूर्यास्तानंतर स्पर्श करु नये. सूर्यास्तानंतरही तुळशीची पाने तोडू नयेत. तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपावर पाणी वाहू नये. असे केल्यास घरात दुर्देव आणि दारिद्र येते, असेही मानले जाते.