खबरदार: तुम्हीही या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर व्हा सावध

काही पदार्थ असे असतात जे फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. परंतु तरीही आपण फ्रिजमध्ये ठेवतो.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

सर्वसाधारणपणे थंड वातावरण हे खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसाठी जास्त सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. कमी तापमानात अन्नाची फार कमी प्रमाणात नासाडी होते, मात्र प्रत्येक गोष्टींसाठी हाच नियम लागू होतो असे नाही. अनेक लोक बाजारातून भाजीपाल्याची खरेदी केली की, आल्या बरोबर फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु ते ताजे राहण्याऐवजी 2 दिवसात खराब होतात. अगदी भाज्यांपासून ते डाळींपर्यंत अनेक गोष्टी आजकाल फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. काही पदार्थ असे असतात जे फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. परंतु तरीही आपण फ्रिजमध्ये ठेवतो. यासाठी फ्रीजमध्ये नक्की काय ठेवावे किंवा ठेऊ नये हे जाणून घेणे गरजेचे आहे.

टोमॅटो - न पिकलेले टोमॅटो हे सर्वसाधारण तापमानावर (रूम टेम्परेचर) ठेवले जावेत. यामुळे ते पिकत असताना ते अधिक चविष्ट आणि ज्युसी होतात. खूप थंड वातावरणात ते तितके चांगले पिकत नाहीत.

कांदा - न सोललेल्या कांद्याला टिकण्यासाठी हवेशीर जागी ठेवण्याची गरज असते. ते जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते आर्द्रतेमुळे, दमटपणामुळे कुजू शकतात किंवा मऊ पडू शकतात.

सुकामेवा - फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे सुक्यामेव्याचा खुसखुशीतपणा आणि nutty flavor कमी होतो. शिवाय फ्रीजमधल्या इतर पदार्थांचा वास त्यांना लागायची शक्यता असते. या ऐवजी सुकामेवा हा हवाबंद पिशवीत बाहेर ठेवावा. (हेही वाचा : आता लघवीचा रंग आणि वासावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य)

लसूण - लसूणही कांद्याप्रमाणे फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर गळून जातो. लसून फ्रिजमध्ये ठेवला ते अंकुरीत होईल. कांदा आणि लसून हा कोणत्याही अंधार असलेल्या जागी ठेवावा.

बटाटा - बटाटा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याच्यातील स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होते. यामुळे बटाट्याच्या चवीवर परिणाम होतो. बटाटे उन्हापासूनही लांब ठेवायला हवेत. बटाटे हे नेहमी प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढून ठेवावे.

कलिंगड - कलिंगड किंवा खरबूज हे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यावर चिलिंग इफेक्ट होऊन त्यातील पोषकद्रव्ये कमी होऊ शकतात.

केळी - केळी जर फ्रीजमध्ये ठेवली तर केळी पिकण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे केळ्याची साल काळी पडते. याउलट केळी फ्रिजमध्ये न ठेवता घरात इतरत्र ठेवल्यास अजून काही काळ ती चांगली राहू शकतात.

ब्रेड - फ्रीज ब्रेडमधली आर्द्रता (moisture) शोषून घेते, ज्यामुळे ब्रेड वेळेआधीच शिळा होऊ शकतो. त्यामुळे ब्रेड ठेवायचाच झाल्यास तो प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून ठेवावा.

लिंबू - लिंबू आणि संत्री हे सिट्रीक अॅसिड असणारे फळं आहेत. हे जास्त काळ थंड्या ठिकाणी चांगलं राहू शकत नाही. असे झाले तर हे फळ काळे पडते. फ्रिजमध्ये ठेवल्याने यांच्यातील रस आटून जातो.अगदी भाज्यांपासून ते डाळींपर्यंत अनेक गोष्टी आजकाल फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. काही पदार्थ असे असतात जे फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. परंतु तरीही आपण फ्रिजमध्ये ठेवतो.

दरम्यान, फ्रिजमधून सामान काढताना किंवा पाणी पिताना अनेकजण दरवाजा उघडा ठेवतात. अशात फ्रिजमधील सगळी हवा बाहेर निघून जाते. यानेही फ्रिज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजचा दरवाजा नेहमी नेहमी उघडू नका. तसेच अनेकजण फ्रिजमध्ये सगळेच पदार्थ ठेवून फ्रिज गच्च भरुन ठेवतात. असे केल्याने फ्रिज लवकर खराब होऊ शकतो. फ्रिजमध्ये हवेसाठी काही जागा ठेवावी.