लिंगाच्या लहान आकारामुळे निराश? जाणून घ्या स्त्रीला Sex मध्ये संतुष्ट करण्यासाठी पुरुषाचे शिश्न किती लांबीचे असावे

त्यात पहिल्या रात्री आपले शिश्न अथवा लिंग पाहिल्यावर स्त्रीला काय वाटेल हे विचारही त्यांच्या मनात चालू असतात. यातूनच आपले लिंग लहान तर नाही ही भीती निर्माण होते त्याचा परिणाम सेक्स वर होऊ शकतो.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

पहिल्या सेक्सचा (Sex) अनुभव हा दोन्ही पार्टनर्ससाठी खास असतो. स्तीयांना नक्की काय आवडते, त्या कशाने उद्दपित होतात याची बरोबर माहिती पुरुषांना असते. सेक्समध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘संभोग’ (Intercouce Sex), आणि याच गोष्टीला पुरुष घाबरत असतात. आपण स्त्रीला पूर्णतः संतुष्ट करू शकू का नाही ही भीती त्यांच्या मनात असते. त्यात पहिल्या रात्री आपले शिश्न अथवा लिंग पाहिल्यावर स्त्रीला काय वाटेल हे विचारही त्यांच्या मनात चालू असतात. यातूनच आपले लिंग लहान तर नाही ही भीती निर्माण होते त्याचा परिणाम सेक्स वर होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्त्रीला सेक्समध्ये पूर्णतः संतुष्ट करायला लिंगाची लांबी (Penis size) नक्की किती असायला हवी.

महिलांना शारिरीक सुख मिळण्यासाठी पुरुषांच्या लिंगाचा आकार फार महत्वपूर्ण असतो. सेक्स दरम्यान जर पुरुषांच्या लिंगाचा आकार आणि महिलांच्या योनीची खोली यांच्यात समतोल झाला नाही तर कौटुंबिक जीवनात अनेक समस्या निर्माण होवू शकतात. मात्र लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. महत्वाचे म्हणजे स्त्रीच्या योनीत जाऊन त्यात शुक्राणू सोडण्याइतपत लिंगाची लांबी गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ताठरता आलेल्या लिंगाची लांबी 3-5 इंच असते. हेही ध्यानात ठेवा की सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका)

स्त्रीचा योनीमार्ग हा साधारणपणे पाच इंच इतका खोल असतो. मात्र त्यांच्या लैंगिक संवेदना किंवा सेक्समुळे आनंद मिळण्याची क्षमता ही फक्त बाहेरील एक दीड ते दोन इंच भागातच असते. त्यामुळे पुरुषाचे शिश्न ताठ असलेल्या अवस्थेत दोन इंच लांब असेल तरी स्त्रीला सेक्समध्ये पूर्ण आनंद मिळू शकतो. त्यामुळे लिंगाच्या आकाराबद्दल घाबरून न जाता दोघांना ज्या गोष्टी हवी आहेत त्या देणे याच्यावर भर ठेवा. सहसा स्त्रिया या संभोगाने नाही तर स्पर्शाने उत्तेजित होतात. त्यांना लिंग-योनीच्या संबंधापेक्षा शरीराचे मिलन जास्त महत्वाचे असते. त्यामुळे संभोगापेक्षा शारीरिक दृष्ट्या तुम्ही दोघे एकमेकांशी कम्फर्टेबल असणे गरजेचे आहे.  पण जार का लिंगाच्या ताठरपणा बद्दल काही समस्या असतील तर त्याच्यावर उपाय करणे गरजेचे आहे.