Miss Universe 2022 Live Streaming Online: दिविता राय करत आहे देशाचे प्रतिनिधित्व, जाणून घ्या मिस युनिव्हर्स स्पर्धा तुम्ही कधी, कुठे आणि कसे पाहू शकता
त्याचवेळी कर्नाटकची दिविता (Divita Rai) राय आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचे ड्रेस आणि स्टाइलचे व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.
Miss Universe 2022: दरवर्षीप्रमाणे यंदाही मिस युनिव्हर्स 2022 (Miss Universe 2022) सुरू होणार आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा 14 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच शनिवारी न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मोरिअल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू होईल. या दिमाखदार स्पर्धेत जगभरातून सुमारे 90 महिलांनी सहभाग घेतला आहे. त्याचवेळी कर्नाटकची दिविता (Divita Rai) राय आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचे ड्रेस आणि स्टाइलचे व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. सोन्याचा पक्षी बनून (Golden Bird) ती देशाचे नेतृत्व करत आहे. या वर्षीच्या विजेत्याला मुकुट मिस युनिव्हर्स हरनाज कौर सिंधू (70th Miss Universe Harnaaz Sandhu) घालणार आहे. हरनाजने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकून भारताचे नाव उंचावले होते.
मिस युनिव्हर्स स्पर्धा कधी आणि कुठे बघणार?
मिस युनिव्हर्स स्पर्धा (71वी मिस युनिव्हर्स) शनिवारी म्हणजेच 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. मात्र, देशात 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम JKN18 चॅनलच्या अधिकृत Facebook आणि YouTube चॅनलवर (Miss Universe 2023 youtube live) पाहू शकता. यासोबतच वूट अॅपवरही याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम माजी मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कल्पो आणि प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्व जीनी माई जेनकिन्स होस्ट करणार आहेत. (हे देखील वाचा: VD12 FIRST Look: विजय देवरकोंडाच्या आगामी VD 12 चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, पोलिसाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता)
कोण आहे दिविता राय?
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिविताचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. तिचे वय 25 वर्षे आहे. ती व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. माहितीनुसार, दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे. यासह, ती 2018 मध्ये फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत दुसरी रनरअप देखील होती.