चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचे दुष्परिणाम, होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या

तुम्ही पाणी पिण्यात आणखी अनेक चुका करता. या चुका तुमच्या क्वचितच लक्षात येत असतील. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने तुम्हाला शारीरिक त्रासही होऊ शकतो.

Photo Credit: Pixabay

शरीरात 75% पाणी असते. पाणी शरीराच्या विविध भागांमध्ये पोषक तत्वे वाहून नेण्यास मदत करते. निरोगी व्यक्तीने दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे असेही म्हटले जाते. मात्र बदलती जीवनशैली आणि धावपळीच्या जीवनात लोकांना गरजेनुसार पाणीही पिणे शक्य होत नाही. तुम्ही पाणी पिण्यात आणखी अनेक चुका करता. या चुका तुमच्या क्वचितच लक्षात येत असतील. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने तुम्हाला शारीरिक त्रासही होऊ शकतो. पाणी पिण्याची सवय सुधारून तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही सामान्य चुकांबद्दल सांगणार आहोत , ज्यामध्ये सुधारणा करून तुम्ही योग्य प्रकारे पाणी पिऊ शकता.

1. सकाळी पाणी  न पिणे 

आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. पण बहुतेक लोक असे करत नाहीत. ही समस्या अधिकतर तरुणांमध्ये दिसून येते. ते पाण्याऐवजी चहा-कॉफी पिणे पसंत करतात. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. यासोबतच शरीराची स्वच्छता चांगली होते. वजन कमी करण्यास देखील मदत होते. गरम पाणी पेरिस्टॅलिसिसच्या प्रक्रियेत मदत करते म्हणजेच स्नायू सक्रिय करते. झोपेच्या वेळी स्नायू विश्रांतीच्या स्थितीत असतात.

2. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे 

प्लास्टिक बंदीसाठी सातत्याने जनजागृती केली जात आहे. प्लास्टिकमुळे शरीराची तसेच पर्यावरणाची हानी होते. या सगळ्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्याची बिनदिक्कतपणे विक्री सुरू आहे. ज्याला तहान लागली असेल तो काही रुपयांत बाटली विकत घेतो आणि पाणी पितो.पण घराबाहेर प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने होणाऱ्या हानीकडे कुणीच लक्ष देत नाही.संशोधनात असे दिसून आले आहे की प्लास्टिकमध्ये आढळणारे बिस्फेनॉल-ए किंवा बीपीए, पॉलिथिलीन टेरेफ्थालेट केमिकल आणि फॅथलेट शरीराला नुकसान पोहोचवतात. पिण्याच्या पाण्यासाठी तुम्ही स्टील, तांब्याच्या बाटल्या वापरू शकता. 

3. जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे

अनेकदा लोक जेवल्यानंतर पाणी पिण्याची चूक करतात. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अनेक हानी होऊ शकतात. वास्तविक, अन्न खाल्ल्यानंतर प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वे शरीरात शोषून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण जर तुम्ही पाणी पिऊन ती प्रक्रिया संपवली तर तुम्हाला त्याचे फायदे मिळत नाहीत. असे केल्याने तुम्हाला गॅस आणि अॅसिडिटीशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. दुसरे कारण म्हणजे अन्न पचण्यासाठी शरीराला विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. पण पाणी प्यायल्याने हे तापमान कमी होते आणि तुमचे अन्न नीट पचत नाही.

4.जास्त पाणी पिणे 

असे म्हटले जाते की पाणी पिणे फायदेशीर आहे. याचा विचार करून काही लोक गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ लागतात. काही लोक भूक लागल्यावरही पाणी पितात, पण हे योग्य नाही. जास्त पाणी पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

5 .उभे  राहून पाणी पिणे

उभे राहून पाणी पिणे आयुर्वेदात चुकीचे मानले गेले आहे. पाणी नेहमी ग्लासमधून प्यावे. काही लोक एका दमात  पाणी पितात. यामुळे तहानही भागत नाही आणि अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. उभे राहून पाणी प्यायल्याने ते पाणी थेट किडनीपर्यंत पोहोचते आणि फिल्टर न होता बाहेर येते. दुसरे म्हणजे उभे राहून पाणी प्यायल्याने जास्त दाबाने पाणी पोटात पोहोचते. त्यामुळे पचनसंस्था कमजोर होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी होऊ शकते.