थंडीत केसगळती आणि डँड्रफला करा 'या' खास ट्रिक्सनी गुड बाय!
म्हणून या काही ट्रिक्सचा उपयोग करुन थंडीत केसगळचती आणि डँड्रफला करा गुड बाय!
प्रत्येक ऋतुमधील हवामानात बदल होत असल्याने त्याच्या आपल्या शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे या वेळी आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाची बाब ठरते. तसेच थंडीत केसगळती आणि डँड्रफची समस्या उद्भवते. म्हणून या काही ट्रिक्सचा उपयोग करुन थंडीत केसगळचती आणि डँड्रफला करा गुड बाय!
केसांना मसाज करा
थंडीत जर तुम्हाला केसांची काळजी घ्यायची असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना मसाज करा. तसेच कोणत्याही प्रकारचे केसांसाठी उपयोगी असणारे तेल लावून मसाज केल्यास केस उत्तम राहतील. तर डोक्याला मसाज केल्याने शरीराला रक्त पुरवठा सुरळीत चालू राहण्यास मदत होते.
केस धुण्यापूर्वी तेलचा वापर करा
काही लोक रात्री तेल लावून सकाळी केस धुतात. मात्र अंघोळीपूर्वी तेल लावणे चांगले असते असे सांगितले जाते. तसेच केसांची गळती आणि डँड्रफ थांबविण्यासाठी बदाम, खोबरे किंवा कोणतेही आयुर्वेदिक तेलाचा उपयोग करा. त्यामुळे केस गळण्यास आणि डँड्रफ दूर राहण्यास मदत होईल.