राशी भविष्य(फोटो सौजन्य- फाईल इमेज)

19 मार्च 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तसेच नवीन कामाला सुरुवात करु नका. कोणाताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.

शुभ उपाय- वडाच्या झाडाला पाणी घाला.

शुभ दान- भुकलेल्यांना अन्न दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

वृषभ: आज तुम्हाला विरोधकांकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी भांडणे होतील. मुलांच्या भविष्याबाबत चिंता सतावेल. संयमाने निर्णय घ्या.

शुभ उपाय- गुळ घाऊन बाहेर जा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- सफेद

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींना आज दिवस उत्तम जाईल. तसेच प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- गाईला चारा खाऊ घाला.

शुभ अंक- 1

शुभ रंग- आकाशी

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासाला जाताना काळजी घ्या. प्रकृतीची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

शुभ उपाय- आजच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा देऊ करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- करडा

सिंह: आज तुम्हाला धनलाभ होणार आहे. घरातील मंडळींची साथ लाभेल. कामात चुका करणे टाळा. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवाल.

शुभ उपाय- दही किंवा मध खाऊन बाहेर जा.

शुभ दान- आजारी व्यक्तींना पैश्यांच्या बाबत मदत करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आज दुसऱ्यावर पैसे खर्च करणे टाळा. घरात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आई-वडिलांशी आदराने वागा. प्रिय व्यक्ती तुम्हाला तुमचा चुका समजून देण्याचा प्रयत्न करेल. सामाजिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे.

शुभ उपाय- शिवलिंगावर पाणी अर्पण करा.

शुभ दान- वृद्ध व्यक्तींना वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- पिवळा

तुळ: कायद्यासंबंधित कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नवी संधी साधून येईल. मित्रपरिवाराशी गाठभेट होईल.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- मंदिर उभारणीसाठी मदत करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- जांभळा

वृश्चिक: वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस आनंदात घालवता येणार आहे. घरातील कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी वाद होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खुश असेल.

शुभ उपाय- घरातील वृद्ध व्यक्तींना छानसे गिफ्ट द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळा

धनु: धनु राशीतील व्यक्तींनी आज वाहन सावधपणे चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. घरातून निघण्यापूर्वी आई-वडिलांचा आशिर्वाद घ्या. मित्रपरिवारासह नव्या गोष्टी शिकण्यास तयार रहा. प्रिय व्यक्तीकडून तुमचे आज कौतुक केले जाईल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर जा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- हिरवा

मकर: तुम्ही आज एका वेगळ्याच अंदाजात काम पूर्ण कराल. प्रकृती थोडी बिघडेल परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रिय व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सूप प्या.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- क्रिम कलर

कुंभ: राशीप्रमाणे आजचा तुमचा दिवस आळसावलेला जाईल. काम करण्याचा उत्साह वाटणार नाही. आई-वडिल दोघांशी चांगले वागा. कामात दिरंगाई करु नका. मित्रपरिवारासह बाहेर फिरायला जा.

शुभ उपाय- कोणाचे उष्ट खाऊ नका.

शुभ दान- अत्तर दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- केशरी

मीन: मीन राशीतील व्यक्तींनी आज संभाळून काम करा. अतिघाई संकटात नेई अशी स्थिती स्वत:वर ओढवून घेऊ नका. आई-वडिलांचा मान राखा. नोकरीच्या बाबतीत उत्तम दिवस असेल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल

शुभ उपाय- अर्धा कप दुध प्या.

शुभ दान- राईचे तेल दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा